मुंबई, 28 मे: मुंबईत एका चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वसईतल्या (Vasai) एका साडीच्या दुकानात दोन महिलांनी केलेली ही संपूर्ण चोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलांनी जवळपास 90 हजारांच्या साड्यांची चोरी केली आहे. पोलिसांनी (Police) या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी 27 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वसईतील स्टेला संकुलातील सद्गुरूज हातमाग साडीच्या दुकानात दोन महिला आपल्या मुलीच्या लग्नासाठी साड्या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. मोठी बातमी: प्रवाशांनी भरलेली बस पलटली, अपघातात 25 जण जखमी साडी पसंत करताना अतिशय हुशारीने, जिथे एखादी महिला साडी पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराचे लक्ष वेधून घेते, त्याचवेळी दुसरी महिला दुकानदारानं दाखवलेली साडी आपल्या साडीच्या आत लपवायची. दोन्ही चोरट्या महिलांनी दोन ते तीन वेळा दुकानदाराला बोलण्यात अडकवून नऊ सिल्क पैठणी साड्यांची चोरी केली आणि साडी न घेता दुकानातून परत गेल्या. या दोघी महिलांनी दुकानात उपस्थित दुकानमालक चेतन भट्ट यांना गंडवून साड्यांवर डल्ला मारला. पण दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली आहे.
90 हजारांच्या साड्या चोरणाऱ्या दोन महिला सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. pic.twitter.com/MuGkDKHF5S
— News18Lokmat (@News18lokmat) May 28, 2022
दुकानात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी दोन्ही महिलांच्या प्रत्येक हालचाली बारकाईने कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारावर दुकान मालक चेतन भट्ट यांनी वसई माणिकपूर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.