Home /News /mumbai /

Mumbai Crime: OLA टॅक्सी चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime: OLA टॅक्सी चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुंबईतील धक्कादायक घटना

OLA चालकाकडून अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची मागणी; मुंबईतील धक्कादायक घटना

OLA चालकाकडून अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची मागणी; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime News: मुंबईत एका ओला कॅब चालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई, 28 मे : संपूर्ण देशात मुंबई हे शहर (Mumbai City) महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित मानले जाते. मात्र, आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 15 वर्षीय मुलीचा ओला कॅब (OLA Cab) चालकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील आरे कॉलनीतील रॉयल पाम परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरे पोलिसांत पीडित मुलीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. (Mumbai police arrest Ola cab driver for allegedly molesting 15 year old girl) आरोपी कॅब चालकाला गोरेगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीचं नाव मुरारी कुमार सिंग असे असून तो बिहारचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना 25 मे रोजी घडली होती. आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 25 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एक 15 वर्षीय मुलगी मुंबई विमानतळावर पोहोचली. विमानतळावरुन या मुलीला रॉयल पाम येथे जायचं होतं आणि त्यासाठी तिने ओला टॅक्सी बूक केली. त्यानंतर मुरारी सिंग नावाचा ओला कॅब चालक तेथे पोहोचला. यानंतर कॅब चालक मुरारी याने या मुलीला रॉयल पाम परिसरात ड्रॉप केले. वाचा : दोन लग्नांनंतर महिलेचा तिसऱ्यावर आला जीव, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा यावेळी पीडित मुलीकडे सुट्टे पैसे नव्हते आणि त्यावेळी मी तुम्हाला सुट्टे पैसे आणून देते. यावर आरोपी चालकाने पीडित मुलीकडे अश्लील हावभाव करत पैसे नाहीत तर खाली ये मी देतो असं म्हटलं. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी कॅब चालक हा गाडी चालवत असताना वाटेत तिच्याकडे घृणास्पद नजरेने पाहत होता. इतकंच नाही तर आता मुंबईत तुझा कुणीही मित्र नाहीये तर मला मित्र बनव असंही त्याने म्हटलं. त्यावर पीडितने त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. वाचा : माहिम रेल्वे स्टेशनजवळ रुळावर आढळला तरुणीचा मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर सीसीटीव्हीच्या मदतीने  अटक या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांनी आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार केली होती. या पथकांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यानंतर ओला कॅब चालकाची गाडी बूक करतच आरोपीला अटक केली. या प्रकरणात आरोपीने आपला गुन्हाही कबुल केला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Mumbai

पुढील बातम्या