मुंबई, 17 मे : राज्यात अद्यापही 13 लाख 67 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस (sugarcane) शिल्लक आहे. हा ऊस गाळप होण्यासाठी जून उजाडण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवण्यात येत आहे. परंतु पिकाला तोड येऊपर्यंत शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे मागच्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील (beed farmer suicide) एका शेतकऱ्यांने उसाला आग लावत आत्महत्या केली. यावर राज्य शासनाला आता खडबडून जाग आली आहे. 1 मे नंतर गाळप होणाऱ्या उसाला (sugarcane farmer) 200 रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (cm uddhav thackeray) उपस्थित घेण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले.
हे ही वाचा : राज्यसभेसाठी मविआत रस्सीखेच; सहाव्या जागेसाठी शिवसेना आग्रही, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार असून राज्यात १ मे २०२२ नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे ५२ लाख टन गाळप अपेक्षित आहे. यापैकी आजअखेर ३२ लाख टन गाळप झाले आहे. तसेच १ मे २०२२ नंतर गाळप होणाऱ्या व ५० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहतूक होणाऱ्या साखर आयुक्तांनी अनिवार्य ऊस आदेश काढलेल्या ऊसास प्रतीटन पाच रुपये प्रती किलोमीटर वाहतूक अनुदान देण्यात येईल, असेही सहकार मंत्री पत्रकार परिषदेत माहिती दिली.
हे ही वाचा : Pune: स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, भाजपच्या तिघांवर गुन्हा दाखल
गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये राज्यात एकूण १३.६७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. सन २०२०-२१ मध्ये ११.४२ लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली होते. मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. तसेच १६ मे २०२२ अखेर १०० सहकारी व ९९ खासगी असे १९९ साखर कारखान्यांकडून १३००.६२ लाख टन ऊस गाळप झालेले आहे.
मागील वर्षापेक्षा सुमारे ५५,९२० टन प्रतीदिन जास्त गाळप क्षमतेने गाळप होत आहे. मागील वर्षी याच दिनांकास १०१३.३१ लाख टन गाळप झालेले होते. चालू वर्षी २८७.३१ लाख टन गाळप जास्त झालेले आहे. बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.