वॉशिंग्टन, 07 डिसेंबर : कोरोनाच्या महासाथीतून आता कुठे मोकळा श्वास मिळतो आहे. आता 2022 वर्ष संपत आलं आहे आणि 2023 वर्षात काय वाढून ठेवलं आहे, अशी भीतीही वाटू लागली आहे. याचदरम्यान काही दिवसांपूर्वी झोम्बी व्हायरसची चर्चा होऊ लागली आणि आता असाच एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. फिल्ममध्ये तुम्ही झोम्बींना पाहिलं असेल. अशाच झोम्बीसारख्या वागणाऱ्या काही लोकांचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हादराल.
काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी बरेच व्हायरस मिळाल्याचा दावा केला. बर्फात हे व्हायरस हजारो वर्षांपासून आहेत. त्यापैकी एक व्हायरस 48,500 वर्षांपेक्षा जुना आहे. शास्त्रज्ञांनी 13 नव्या पॅथोजेनना पुनर्जीवित केलं आणि त्यांची वैशिष्ट्य सांगितली. याला झोम्बी व्हायरस नाव देण्यात आलं. त्यानंतर आता हा झोम्बीसारखी अवस्था असलेल्या लोकांचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन महिला रस्त्यावर दिसत आहेत. त्या खूप विचित्र वागत आहेत. डोकं वर तोंड उघडं, शरीराला लकवा मारल्यासारखी ही महिला. रस्त्यावर चालण्याचा ती प्रयत्न करते आहे. त्यांचं शरीर आकड्यासारखं दिसतं आहे. पुढे आणखी एक व्यक्ती अशीच रस्त्यावर वाकलेली दिसते आहे.
हे वाचा - जिममध्ये वर्कआउट करताना तरुणांचा का होतोय मृत्यू? हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितली प्रमुख कारणं
काही लोकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. @Oyindamola ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ अमेरिकेच्या फिलाडेल्फियामधील आहे. यूएसमध्ये काय होतं आहे असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. या व्हिडीओबाबत केल्या जाणाऱ्या दाव्याचं न्यूज 18 लोकमत समर्थन करत नाही.
कॅनडातील हरणांना झोम्बी व्हायरसची लागण
याआधी कॅनडात हरणांना या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं होतं. VICE World News च्या रिपोर्टनुसार या व्हायरसची लागण झालेलं हरण दुसऱ्या हरणांची शिकार करून त्यांना आपलं भक्ष्य बनवत होते. कॅनडातील काही भागात याला क्रोनिक वेस्टिंग डिसीज म्हणून घोषित करण्यात आलं. CWD ने हरणांमधील हा व्हायरस इतर प्राणी किंवा इतर माणसांमध्येही पसरू शकतो, अशी चिंता व्यक्त केली होती. माणसांना या व्हायरसची लागण फक्त प्राण्याचं मांस खाल्ल्याने नाही तर प्राण्याची लघवी, लाळ, थूंक याच्या संपर्कात आल्यानेही होऊ शकतो. या व्हायरसची लागण झाल्यास माणसांमध्ये डायरिया, डिप्रेशन आणि लकवा मारल्यासारखी लक्षणं दिसू शकतात. सुदैवाने अद्याप माणसांमध्ये या व्हायरसची लागण झाल्याचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही.
हे वाचा - Shocking! जन्माच्या पाचव्या दिवशीच चिमुकलीला मासिक पाळी; डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण
कॅनडात हा आजार सर्वात आधी 1996 सालीसुद्धा आढळला होता. एका फार्ममध्ये हा व्हायरस पसरला. त्यानंतर इतर प्राण्यांमध्ये हा व्हायरस पसरत गेला. त्यानंतर या सर्व प्राण्यांना मारण्यात आलं. जेणेकरून इन्फेक्शनवर नियंत्रण मिळवता येईल. बॅक्टेरिया आणि इतर व्हायरसची जेनेटिक माहिती मिळू शकते पण हरणांमध्ये पसरणाऱ्या या व्हायरसबाबत माहिती मिळणं शक्य नाही.
Brooo, what’s happening in the USA🙆🏽♂️💀? pic.twitter.com/hUJCjZ5Xlx
— Oyindamola🙄 (@dammiedammie35) December 6, 2022
दरम्यान सध्या झोम्बी म्हणून जो हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तो खरंच झोम्बी व्हायरसचा परिणाम आहे की ड्रग्जचा?, हा एखादा प्रँक व्हिडीओ आहे की एखाद्या फिल्मचं शूटिंग? हे माहिती नाही. यावर कमेंट करताना लोक आपाआपल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येकाने वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Virus