मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! जन्माच्या पाचव्या दिवशीच चिमुकलीला मासिक पाळी; डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

Shocking! जन्माच्या पाचव्या दिवशीच चिमुकलीला मासिक पाळी; डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

जन्माच्या 5 दिवसांनंतर चिमुकलीला रक्तस्राव होऊ लागला आणि घाबरलेल्या आईने तिला रुग्णालयात नेलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

बीजिंग, 06 डिसेंबर : मुली वयात येऊ लागताच त्यांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. शारीरिक बदलांमध्ये मासिक पाळी अर्थात पिरियडसयेणं देखील समाविष्ट आहे. जेव्हा मुली पौगंडावस्थेत येतात तेव्हा मासिक पाळीचाही त्यात समावेश असतो. परंतु चीनमध्ये असाच एक प्रकार समोर आला की ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं तिच्या 5 दिवसांच्या मुलीला पिरियडस आले म्हणून रुग्णालयात दाखल केलं. होय, या महिलेची मुलगी केवळ 5 दिवसांची नवजात बालिका असून, तिला पिरियडस आल्याचं स्पष्ट झालं आहे.

चीनमधील जहेजिआंग प्रांतातील एक महिला तिच्या 5 दिवसांच्या नवजात बालिकेला कुशीत घेऊन रुग्णालयात गेली. या महिलेच्या मुलीला पिरियड येत होते. जन्मानंतर केवळ पाच दिवसांतच मुलीला ब्लडिंग सुरू झाल्यानं ही महिला घाबरून गेली. ती तातडीने या नवजात मुलीला घेऊन रुग्णालयात पोहोचली. परंतु, रुग्णालयातील डॉक्टरांनी या नवजात बाळाची तपासणी केली असता, ही बाब नॉर्मल असून, घाबरण्याचं कारण नाही, असं सांगितलं. पाच दिवसांच्या नवजात मुलीला पिरीयडस येणं हे नॉर्मल कसं असू शकतं, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

हे वाचा - Period Blood On Skin : स्किन केअरसाठी पिरियड ब्लडचा वापर! पाहा सोशल मीडिया ट्रेंड किती सुरक्षित?

चायना प्रेसनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. ही बाब नॉर्मल असल्याचं जेव्हा डॉक्टरांनी या मुलीच्या पालकांना सांगितलं तेव्हा ही बाब त्यांनाही पटली नाही. मात्र डॉक्टरांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना सांगितलं की याला निओनेटल मेंस्ट्रुएशन म्हणजेच नवजात मासिक पाळी असं म्हणतात. चीनमधील हांग्झोउमधील फर्स्ट रुग्णालयातील डॉ. वांग यांनी याबाबत सांगितलं की, "काही वेळा गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यांमध्ये भ्रुणाच्या शरीरात इस्ट्रोजेन जातं. हेच इस्ट्रोजेन रक्ताप्रमाणं बाळाच्या योनीतून बाहेर पडतं. ही बाब बहुतांश नवजात मुलींमध्ये दिसून येते"

"जेव्हा हे इस्ट्रोजेन बाहेर पडतं, तेव्हा लोक याला पिरीयडस समजून घाबरून जातात. परंतु, हा प्रकार केवळ एका आठवड्यापर्यंत होतो. जेव्हा नवजात मुलीच्या शरीरातून इस्ट्रोजेन पूर्णपणे निघून जातं, तेव्हा ब्लडिंग बंद होतं. त्यामुळे जन्मानंतर नवजात मुलींच्या योनीतून रक्तस्त्राव झाला तर घाबरून जाण्याचं कारण नाही. ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे. परंतु, बहुतांश पालकांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे या कारणानं नवजात मुलीच्या जन्मानंतर तिच्या डायपर किंवा कपड्यांवर रक्ताचे डाग दिसल्यास पालक घाबरून जातात. परंतु, असं होणं एकदम नॉर्मल असतं, हे पालकांनी लक्षात घ्यावं", असं डॉ. वांग यांनी सांगितलं.

हे वाचा - Effect Of Periods On Girls Height : मासिक पाळीनंतर खरंच मुलींची उंची वाढत नाही का?

ही घटना 2019 मधील आहे. पण आता ती पुन्हा चर्चेत आली आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle, Lucknow Super Giants, Small baby, Viral