मराठी बातम्या /बातम्या /Viral /एवढं गोड कोण हसतं! Zomato च्या डिलिव्हरी बॉयने जिंकलं सगळ्यांचं मन, VIDEO तुफान व्हायरल

एवढं गोड कोण हसतं! Zomato च्या डिलिव्हरी बॉयने जिंकलं सगळ्यांचं मन, VIDEO तुफान व्हायरल

कोण आहे हा सोनू आणि याच्या स्माईलची जगभरात का होतेय चर्चा वाचा सविस्तर

कोण आहे हा सोनू आणि याच्या स्माईलची जगभरात का होतेय चर्चा वाचा सविस्तर

कोण आहे हा सोनू आणि याच्या स्माईलची जगभरात का होतेय चर्चा वाचा सविस्तर

मुंबई, 29 फेब्रुवारी : सध्या सोशल मीडियावर टीक टॉकचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. टीक टॉकवर दानिश नावाच्या एका युझरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ह्या व्हिडिओतील तरुणाचा फोटो झोमॅटोने आपल्या ट्विटर अकाऊंटवर प्रोफाईलसाठी अपलोड केला आहे. कोण आहे हा तरुण आणि काय आहे खास? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सोनू नावाच्या या झोमॅटोची फूड डीलिवरी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर झोमॅटोने आपल्या ट्वीटरच्या प्रोफाईलवर याचा फोटो अपलोड केलाय. आता हे आकऊंट happy rider साठी फॅन अकाऊंटसारखं काम करेल असं कॅप्शन कंपनीने दिलं आहे.

हेही वाचा-60 वर्षांचा सुपरहिरो! महिलेला वाचवण्यासाठी 40 फूट उंचीवरून मारली उडी आणि...

या व्हिडिओमध्ये सोनूच्या कमाईबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने हसत हसत त्याची उत्तर दिली. त्याच्या स्माईलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. डिलिव्हरी बॉय आणि त्याच्या स्मितबद्दलच्या सकारात्मकतेनं सर्वांच्या मनाववर भुरळ घातली आहे. जेव्हा दानिश सोनूला त्याच्या कमाईबद्दल विचारतो तेव्हा तो सांगतो की तो 12 तास काम करतो. आणि त्यासाठी त्याला Rs 350. रुपये मिळतात. त्यानंतर, जेवणाबद्दल विचारले असता सोनू म्हणतो की हो, रद्द केलेला ऑर्डर त्यांना मिळतात. या प्रश्नाचे उत्तर देताना सोनू म्हणतो की कंपनीत कोणतीही अडचण नाही. कंपनी वेळेवर पैसे आणि जेवण देते.

झोमॅटोच्या या डिलिव्हरी बॉयचा फोटो पुणे आणि महाराष्ट्र पोलिसांनीही ट्विट करत कॅप्शन दिलं आहे. या सोनूच्या स्माईलची जगभरात आता चर्चा होत आहे.

हेही वाचा-विमानात असं काही घडलं की क्रू मेंबर्ससह सगळेच म्हणाले 'कबुतर जा जा', पाहा VIDEO

First published:
top videos

    Tags: Zomato