मराठी बातम्या /बातम्या /Viral /

60 वर्षांचा सुपरहिरो! महिलेला वाचवण्यासाठी 40 फूट उंचीवरून मारली उडी आणि...

60 वर्षांचा सुपरहिरो! महिलेला वाचवण्यासाठी 40 फूट उंचीवरून मारली उडी आणि...

एका 60 वर्षांच्या जहाजाच्या कॅप्टनने 40 फूट उंच समुद्रात उडी मारून महिलेचा जीव वाचवला.

एका 60 वर्षांच्या जहाजाच्या कॅप्टनने 40 फूट उंच समुद्रात उडी मारून महिलेचा जीव वाचवला.

एका 60 वर्षांच्या जहाजाच्या कॅप्टनने 40 फूट उंच समुद्रात उडी मारून महिलेचा जीव वाचवला.

  • Published by:  Priyanka Gawde
म्यानमार, 29 फेब्रुवारी : काही लोकं इतकं निस्वार्थी आयुष्य जगतात की इतरांचा जीव वाचवण्यासाठी ते आपल्या जीवाची बाजीही लावण्यास मागे पुढे पाहत नाहीत. असाच प्रकार म्यानमारमध्ये घडला. चक्क एका 60 वर्षांच्या जहाजाच्या कॅप्टनने 40 फूट उंच समुद्रात उडी मारून महिलेचा जीव वाचवला. या घटनेनंतर सोशल मीडियावर या कॅप्टनला सुपरहिरो या नावाने संबोधले जात आहे. ही घटना म्यानमारच्या डाला पोर्ट येथे घडलीय जहाजावरून उतरताना अचानक 34 वर्षीय महिला किन चान म्या खाली पडली. ही महिला खाली पडली तेव्हा दुसऱ्या बाजूने आणखी एक जहाज येत होते. या अपघात टाळण्यासाठी चक्क जहाजाच्या कॅप्टनने पाण्यात उडी घेतली, आणि या महिलेचा जीव वाचवला. एका क्षणाचा विलंब झाला असता, तरी या महिलेला आपले प्राण गमवावे लागले असते. वाचा-आई शप्पत! सापानं गिळलेला टॉवेल डॉक्टरांनी खेचून काढला बाहेर, पाहा VIDEO वाचा-याला म्हणतात जुगाड! होळीसाठी चक्क पाण्याच्या टॅंकरमधून आणली दारू मात्र फक्त जहाजाच्या कॅप्टननेच नाही तर त्यांना दोन तरुणांनीही मदत केली. कॅप्टन यू मायंट यांनी पाण्यात उडी मारल्यानंतर दोन तरुणही पाण्यात उतरले. या तरुण मुलांचेही कॅप्टन यू यांनी आभार मानले. डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत यू यांनी, “त्या क्षणी मला फक्त महिलेचे प्राण वाचवायचे होते. बाकी कोणताच विचार मी करत नव्हतो. माझ्या मनात एकच विचार आला, मी वयस्कर आहे मी गेलो तरी काही नाही, मात्र महिलेचे प्राण वाचले पाहिजे”, असे सांगितले. वाचा-निर्दयीपणाचा कळस, कचरा गोळा करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, VIDEO VIRAL यू यांनी महिलेचे प्राण वाचवल्यानंतर या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या नाका तोंडात पाणी गेल्यामुळं ती बेशुद्ध होती, मात्र आता दोघंही सुखरूप असून कॅप्टन यू यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला.
First published:

Tags: Trending, Viral

पुढील बातम्या