मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - शिकार करायला आलेल्या सिंहाची साध्या झेब्राने केली भयानक अवस्था; धक्कादायक शेवट

VIDEO - शिकार करायला आलेल्या सिंहाची साध्या झेब्राने केली भयानक अवस्था; धक्कादायक शेवट

शिकारीला आलेल्या सिंहांना झेब्राने तुडवलं.

शिकारीला आलेल्या सिंहांना झेब्राने तुडवलं.

सिंहासारख्या शक्तिशाली प्राण्यावरही साधे प्राणी कसे भारी पडू शकतात हे या व्हिडीओतून दिसत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 06 सप्टेंबर : जंगलाचा राजा सिंह... ज्याला माणसंच नाही तर जंगलातील बहुतेक प्राणी घाबरतात. कारण त्याच्या बलाढ्य ताकदीसमोर कुणाचाच टिकाव लागत नाही. पण जर विचार केला तर काहीही शक्य आहे. सिंहासारख्या शक्तिशाली प्राण्यावरही साधे प्राणी भारी पडू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात साध्या झेब्राने शिकार करायला आलेल्या सिंहाची भयानक अवस्था केली आहे (Lions gets stampeded by zebras video).

काही सिंह झेब्राच्या कळपाला पाहून त्यांची शिकार करायला आले. पण सिंहाला वाटली तितकी ही सोपी शिकार नव्हती. कारण झेब्रा एकटा नव्हता तर त्यांचा कळप होता. एकीचं बळ काय असतं हे या झेब्रांनी सिंहाला दाखवून दिलं. एकत्र येत त्यांनी सिंहाचीची अक्षरशः वाट लावून टाकली आहे.  मसाई साइटिंग्स यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आफ्रिकेच्या सेरेंगेट नॅशनल पार्कमधील हा व्हिडीओ आहे.

हे वाचा - आ बैल मुझे मार! त्याच्या शिंगांना आग लावून छाती ताणून दिलं आव्हान; तरुणासोबत शेवटी भयानक घडलं

व्हिडीओत पाहू शकता झेब्रांचा कळप दिसत आहे. त्यांची शिकार करण्यासाठी काही सिंह तिथं येतात. एक सिंह एका झेब्रावर हल्ला करते तेव्हा इतर सर्व झेब्रा आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळतात. झेब्रांचा कळपच्या कळप धावत सुटतो. सिंह त्या कळपात जाऊन झेब्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण झेब्रा वाऱ्याच्या वेगाने धावत सुटतात ते थांबतच नाहीत. सिंह झेब्राला धरायला जातेच काही झेब्रा तिला लाथ मारून उडवतानाही दिसतात. सिंहाला तुडवतच सर्वजण निघून जातात.

" isDesktop="true" id="757174" >

थोडा वेळ तिथं काहीच दिसत नाही. झेब्रा वेगाने पळत गेल्याने माती उडाली आहे. त्यामुळे सर्वत्र धूळच धूळ दिसते. काही वेळाने सर्वकाही स्पष्ट होतं. इतक्या झेब्रांनी तुडवल्यानंतर सिंहाची काय अवस्था झाली असेल, याचा विचारही करायला नको. पण इथं जे चित्र दिसतं ते पाहून धक्काच बसतो. कारण तो सिंह चक्क जिवंत होता. त्याला काहीच झालेलं दिसत नाही. पण इतके झेब्रा अंगावरून गेल्यानंतर त्याला दुखापत नक्कीच झाली असावी.

हे वाचा - खारुताईसोबत घडली अशी गोष्ट, वाचून तुम्ही म्हणाल, ''मला पण खारुताई व्हावसं वाटतंय''

शेवटी इतक्या झेब्रांच्या कळपातून दोन झेब्रांना पकडण्यात या सिंहांना यश मिळालं. दोघांना त्यांनी आपली शिकार बनवली आहे.  ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wild animal