लंडन 5 ऑगस्ट : दुसऱ्या देशात जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. ज्यामध्ये अनेक लोक कायमचं राहाण्यासाठी विचार करतात. तर काही लोक दुसऱ्या देशात फिरायला जाण्यासाठी स्वप्न पाहत असतात. परंतू सगळ्याच लोकांचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. परंतू एक भारतीय खारुताई मात्र भारतातून दुसऱ्या देशात फिरायला गेली.
या खारुताईने भारता बाहेर फिरायला जायचा मनात विचार केला होता की नाही? हे तर आपल्याला माहित नाही, परंतु तिने भारत ते स्कॉटलंड असा शेकडो मैलांचा प्रवास केला. तो ही एका जहाजातून. ज्यानंतर या खारुताईला तेथे राहाण्यासाठी सोय केली जातेय, आहे ना मजेदार?
खरंतर जहाजातून स्कॉटलंडला पोहोचलेल्या या खारुताईला नंतर बोटीवरील लोकांनी प्राण्यांच्या रुग्णालयात नेलं, शेकडो मैलांचा प्रवास करून बोटीने स्कॉटलंडहून भारतात आलेल्या या खारुताईला द न्यू आर्क वाइल्डलाइफ हॉस्पिटल, नॉर्थ ईस्ट वाइल्डलाइफ आणि अॅबर्डीनशायरमधील प्राणी बचाव केंद्रातील कर्मचाऱ्यांनी वाचवले.
The New Ark ने 30 ऑगस्ट रोजी फेसबुकवर या खारुताईच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली, यामध्ये त्यांनी लिहिलं की 29 ऑगस्ट रोजी अॅबरडीनमध्ये पेस्ट सोल्यूशन म्हणून काम करणाऱ्या दोन स्थानिक लोकांचा त्यांना फोन आला. त्यांनी विचारले की एक खारुताई भारतातून स्कॉटलंडला पोहोचली आहे. तिला रेस्क्यू करण्यासाठी तुम्ही तयार आहात का?
हे वाचा : सुंदर दिसण्यासाठी ती पार्लरमध्ये गेली, पण जेव्हा घरी परतली तेव्हा मात्र... नक्की काय घडलं?
ज्या लोकांनी खारुताईला वाचवले त्यांनी सांगितले की त्यांना भारतीय गिलहरींबद्दल फारशी माहिती नाही. कारण भारतात त्यांच्या ४० हून अधिक प्रजाती आहेत. तसे पाहाता ही स्कॉटलंडला पोहोचलेली खारुताई भारतीय पाम गिलहरी असल्याचे रुग्णालयाने सांगितले.
ही एकदम सामान्य प्रजाती आहे, जी देशभरातील बागांमध्ये दिसते. आता या खारुताईच्या राहाण्याची चांगली सोय केली जात आहे.
हे वाचा :हॉटेलबाबत हे रहस्य तुम्हाला माहितीय का? बऱ्याच ठिकाणी नसते 13 नंबरची रुम, काय आहे यामागचं सत्य?
खारुताईला मिळणाऱ्या अशा वागणूकीबद्दल ऐकून तुम्हाला देखील असंच वाटेल की मी खारुताई झाले असते तर किती मस्त झालं असतं. विना टेन्शन, विना तिकीट मला दुसऱ्या देशात असं फिरता आलं असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Top trending, Travel, Viral news