मुंबई, 3 जानेवारी: बाजारात सातत्याने वेगवेगळे खास फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच होत असतात. ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेत मोबाईल उत्पादक कंपन्या अपडेटेड फीचर्सचे स्मार्टफोन बाजारात आणतात. चायनीज स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमीने रेडमी 12C हा नवीन स्मार्टफोन चीनच्या बाजारात लाँच केला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये खास फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहकांना दमदार बॅटरी आणि 50MP चा कॅमेरा मिळेल. रेडमी 12C मध्ये अजून कोणते फीचर्स आहेत, ते जाणून घेऊया.
शाओमीने चीनमधील मोबाईल मार्केटमध्ये रेडमी 12C हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. लवकरच रेडमी 12C सीरिज भारतात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन एक बजेट फोन आहे. या फोनची प्रारंभिक किंमत 699 चायनीज युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 8385 रुपये आहे. या फोनमध्ये 6.71 इंच HD+ डिस्प्ले, 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी असे खास फीचर्स आहेत. शाओमीने रेडमी 12C सीरिज तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे. या लेटेस्ट फोनचा बेस व्हेरियंट 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजचा आहे. या व्हेरियंटची किंमत 699 चायनीज युआन म्हणजेच सुमारे 8385 रुपये आहे. या सीरिजमधला दुसरा व्हेरियंट 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजचा आहे. या मॉडेलसाठी युजर्सला 799 चायनीज युआन म्हणजेच सुमारे 9585 रुपये खर्च करावे लागतील.
हेही वाचा: ‘या’ 5 ई-बाईक भारतात करणार धूम! किंमतही बजेटमध्ये, पाहा लिस्ट
रेडमी 12C चा तिसऱ्या आणि सर्वात महाग व्हेरियंटमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. चायनीज मार्केटमध्ये या व्हेरियंटची किंमत 899 चायनीज युआन म्हणजेच सुमारे 10,785 रुपये आहे. ही सीरिज अन्य देशांमध्ये कधी लाँच होणार याबाबतची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
शाओमी कंपनीने रेडमी 12 C या नव्या स्मार्टफोनच्या मागील बाजूस नॉन-स्लीप टेक्चर दिलं आहे. यात डायगोनल स्ट्रिप आहे. सिक्युरिटीसाठी या फोनच्या मागीलबाजूनस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी फीचर्सचा विचार करता, या नवीन स्मार्टफोनमध्ये एक मायक्रो युएसबी पोर्ट,3.5mm चा हेडफोन जॅक, 4G नेटवर्क आणि एक मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.
रेडमी 12C सीरिजमध्ये युजर्ससाठी 50मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात पोर्टरेट मोड, टाइम-लॅप्स फोटोग्राफी आणि नाइट सीन मोड आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
या स्मार्टफोनमध्ये Mali-G52 MP2 GPU सोबत मीडियाटेक हेलिओ G85 ऑक्टा कोर चिपसेट आहे. हा फोन युजर्सला 4GB+64GB,4GB +128GB आणि 6GB+128 GB अशा तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. रेडमीचा हा नवीन बजेट फोन अँड्रॉईड 12 वर बेस्ड असून MIUI 13 कस्टम ऑपरेटिंग सिस्टिम वर रन होतो.
रेडमी 12 C स्मार्टफोनमध्ये 6.71 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. यात युजर्सला 1650×720 पिक्सेलचं रिझोल्युशन आणि 20:9 चा अस्पेक्ट रेश्यो मिळतो. हा बजेट स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Redmi, Smartphone