नवी दिल्ली 09 एप्रिल : सोशल मीडियावर आपल्याला स्टंटचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. एकीकडे जिथे आपल्या देशातील तरुणाई सतत बाईकवर अनेक अप्रतिम स्टंट करताना दिसते, तर दुसरीकडे परदेशात स्टंटबाजीचं वेड असलेले तरुण एका इमारतीच्या छतावरुन दुसऱ्या इमारतीवर उड्या मारताना दिसत आहेत. जे पाहून यूजर्सचाही श्वास रोखला जातो. सध्या अशाच एका व्हिडिओने सर्वांनाच घाम फोडला आहे. नको ती हौस भोवली; झोका तुटला अन् उंच डोंगरावरून खाली कोसळला तरुण, VIDEO पाहून फुटेल घाम आजकालच्या तरुणांमध्ये स्टंटबाजीचं प्रचंड वेड दिसून येतं. अनेकजण स्टंट करतात आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचे कारनामे पाहून युजर्सने तोंडात बोटं घातली. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा एका उंच इमारतीच्या छतावरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारताना दिसतो.
OMG never do this! Don't gamble with your life!pic.twitter.com/qPOPHcNZyD
— Figen (@TheFigen_) April 6, 2023
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. @TheFigen_ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पिवळा टी-शर्ट आणि हाफ पँट घातलेला मुलगा एका इमारतीच्या छतावर वेगाने धावताना दिसत आहे. त्यानंतर तो इमारतीवरून उडी मारतो आणि दुसऱ्या इमारतीच्या छतावर पोहोचतो. त्याचा ड्रोन व्हिडिओ दाखवला असता, एका बहुमजली इमारतीवर या व्यक्तीने हा स्टंट केल्याचे समजते. प्रचंड उंच इमारतीच्या छतावर कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय व्यक्ती अशा प्रकारे उडी मारताना पाहून वापरकर्ते थक्क झाले आहेत. स्टंट करताना छोटीशी चूकही त्या मुलाचा जीव घेऊ शकते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो वृत्त लिहिपर्यंत सोशल मीडियावर 3 लाख 8 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहून यूजर्स याला अतिशय धोकादायक स्टंट म्हणत आहेत.