मुंबई 09 एप्रिल : आजच्या काळात पर्यटन स्थळांवर पर्यटकांची संख्या वाढवून त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक प्रकारच्या अॅडव्हेंचर्स स्पोर्ट्सचं आयोजन केलं जात आहे. ज्यामध्ये बंजी जंपला लोकांची बरीच पसंती मिळताना दिसते. त्याचबरोबर पॅराग्लायडिंग व्यतिरिक्त इतर अनेक अॅडव्हेंचर्स स्पोर्ट्सचाही काही ठिकाणी समावेश करण्यात आला आहे. ज्याद्वारे पर्यटक नवीन ठिकाणी भेट देताना काहीतरी रोमांचक करताना दिसतात. मात्र, या प्रकारच्या अॅडव्हेंचर्स स्पोर्ट्समध्ये सहभागी होणं कधी-कधी पर्यटकांना महागात पडतं. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी, रेल्वेसमोर उडी मारणार; तेवढ्यात…धक्कादायक CCTV VIDEO काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये डोंगराच्या वरच्या टोकाला एक मोठा झूला दिसत होता, ज्यावर झुलताना एक जोडपं टेकडीवरून खाली पडताना दिसलं होतं. सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ यूजर्ससमोर आला आहे. जो पाहून यूजर्सलाही घाम फुटला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लोखंडापासून बनवलेल्या विचित्र झुल्यावर डोलताना दिसत आहे. @OnlyBangersEth नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोंगराच्या वरच्या भागात दोन लोखंडी खांबांवर बनवलेल्या विचित्र झुल्यावर बसलेला दिसत आहे. दुसरा व्यक्ती हा झुला फिरवत आहे. काही वेळ झोका घेतल्यानंतर अचानक हा झुला तुटतो आणि व्यक्ती झुल्यासह खाली पडताना दिसतो. यानंतर जो व्यक्ती स्विंग फिरवत आहे तो त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मागे धावतो.
Probably not the ride he expected pic.twitter.com/sQXy7bfzER
— OnlyBangers.eth (@OnlyBangersEth) April 7, 2023
सुरक्षा तपासणीशिवाय कोणत्याही अशा खेळात सहभागी होणं म्हणजे आपला जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सना चांगलाच धक्का बसला. वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियावर 1.3 मिलियनपेक्षा म्हणजेच 13 लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. यावर कमेंट करताना एका यूजरने याचे वर्णन ‘हॉस्पिटल राईड’ असं केलं आहे, तर एका युजरचं म्हणणं आहे की, डोंगराच्या माथ्यावर असा स्विंग करणं योग्य नव्हतं.