मराठी बातम्या /बातम्या /Viral /मामीसोबत अफेअर, मामाला समजताच ब्रेकअप; अन् मग नाराज भाच्याचं धक्कादायक कांड

मामीसोबत अफेअर, मामाला समजताच ब्रेकअप; अन् मग नाराज भाच्याचं धक्कादायक कांड

love affair

love affair

चौकशीदरम्यान त्याने केलेल्या खुलाशामुळे पोलीसही चकित झाले. त्याने सांगितलं की तो त्याच्या मामीवर खूप प्रेम करतो. याच कारणामुळे त्याने लग्नही केलं नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

लखनऊ 02 एप्रिल : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करणं लोकांना महागात पडतं. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या झाशीमधून समोर आली आहे. यात एका मुलाने आपल्या प्रेयसीला (मामी) अडकवण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला. मात्र, त्याचा हा डाव यशस्वी झाला नाही आणि तो पकडला गेला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकही थक्क झाले.

हे प्रकरण झाशीच्या प्रेम नगर पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने काही दिवसांपूर्वी एसएसपी कार्यालयात आपला मुलगा मातादीन याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. अपहरणकर्ता 1 लाखांच्या खंडणीसाठी मेसेज करत असल्याचं सांगण्यात आलं. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचंही सांगितलं गेलं.

महिलेचा खून करून मृतदेह पुरला अन् पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जे आलं ते भयानक

याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान पोलिसांनाही खंडणीचे मेसेज येऊ लागले. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली. तपासाला गती देत ​​पोलिसांनी मातादीनचा शोध सुरू केला. दरम्यान, माहितीवरून प्रेमनगर पोलिसांनी झाशी-ललितपूर महामार्गावरून बसमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मातादीनला पकडलं.

चौकशीदरम्यान त्याने केलेल्या खुलाशामुळे पोलीसही चकित झाले. त्याने सांगितलं की तो त्याच्या मामीवर खूप प्रेम करतो. याच कारणामुळे त्याने लग्नही केलं नाही. मामीसोबत बरेच वर्ष अफेअर चालू होतं पण काही महिन्यांपूर्वी मामीने ब्रेकअप केलं आणि त्याच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला.

यावरून दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. दरम्यान, मामीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याचा राग आल्याने त्याने मामीला धडा शिकविण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा कट रचला. त्यासाठी त्याने मामीच्या भावाचे मोबाइल सिम चोरले आणि घरातील सदस्य, नातेवाईक आणि पोलिसांना अपहरणाचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.

बरेच दिवस होऊनही तो घरी न परतल्याने त्याच्या नातेवाईकांनी आपल्या मुलाची अपहरणकर्त्यांपासून सुटका करण्यासाठी पोलिसांकडे विनवणी केली. ज्या क्रमांकावरून धमकीचे मेसेज आले होते, त्या नंबरचा पोलिसांनी शोध घेतला. दरम्यान, हा नंबर महिलेच्या भावाचा असल्याचे समोर आले. त्याची चौकशी करण्यात आली. दरम्यान, मातादीनचे ठिकाण पोलिसांना कळले आणि तो पकडला गेला.

एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, आरोपीचे त्याच्या मामीसोबत संबंध होते. हा प्रकार महिलेच्या पतीला कळला. पतीच्या विरोधामुळे महिलेने स्वत:ला भाच्यापासून दूर केलं. या कारणावरून भाच्याने महिलेला अडकवण्याचा कट रचला. एसपी सिटीने असंही सांगितलं, की महिलेने तक्रार दाखल केली होती की तिच्या भाच्याने तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ बनवला.

First published:
top videos

    Tags: Kidnapping, Women extramarital affair