भुपेंद्र पांचाळ (ग्रेटर नोएडा),01 एप्रिल : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील सेक्टर 155 मध्ये एका रिकाम्या प्लॉटमध्ये 26 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली आहे. ती महिला असून तिच्या पतीने नॉलेज पार्क पोलिस ठाण्यात 9 मार्च रोजी ती गायब असल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान त्या महिलेचा खून करून तिचा मृतदेह पुरल्याची माहिती पोलिसांना स्थानिकांनी दिली होती. त्या माहितीनुसार, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचून पुढील तपास केला आहे.
दारुड्या बापाने शिवीगाळ केली, 22 वर्षीय तरुणीला राग झाला अनावर, घेतला भयानक निर्णय
ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अशोक कुमार म्हणाले की, महिलेचा मृतदेह कुजलेला होता. त्यामुळे त्याच्या कपड्यांवरून त्याची ओळख पटली आहे. दरम्यान मृतदेहाच्या कुटुंबीयांना ओळखीसाठी बोलावण्यात आले. यावरून तिची ओळख पटली आहे. सरिता असे तिचे नाव असून ती दरिन कमबख्शपूर गावातील रहिवासी आहे.
9 मार्च रोजी सरिताच्या पतीने नॉलेज पार्क पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. घटनेच्या सहा दिवसांनंतर, मृत सरिताचा भाऊ नरेंद्र याने जोगिंदर आणि त्याच्या सहा नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सासरच्यांकडून सरिताचे अपहरण करून हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गोऱ्या, निरागस चेहऱ्यामागचं काळं सत्य; या महिलेनं घेतले 29 जणांचे जीव, कोण आहे 'व्हाइट विडो' समंथा?
नरेंद्रच्या तक्रारीच्या नुसार, जोगिंदर आणि त्याच्या नातेवाईकांवर 15 मार्च रोजी आयपीसीच्या कलम 365 (अपहरण), 498A (पती, नातेवाईकांकडून पत्नीवर क्रूरता) आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Uttar pradesh