हैद्राबाद 28 सप्टेंबर : कोणत्याही मुलाचं आणि त्याच्या आई-वडिलांचं हे स्वप्न असतं की, त्याने कोणीतरी मोठा व्यक्ती व्हावं, खूप पैसे कमवावेत आणि आपल्याला म्हातारपणात आपल्याला सुख द्यावं. परंतू प्रत्येकाचं असं स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. तसे पाहाता हा नशिबाचा खेळ आहे. कोणाला खूप जास्त मेहनत घेऊन देखील कामात यश मिळत नाही किंवा मनासारखं काम मिळत नाही. तर काही लोक असे असतात की ज्याचं आयुष्य रातोरात बदलतं. पण एक अशी बातमी समोर आली आहे, जी धक्कादायक आहे. खरंतर या घटनेमुळे एका आई-वडिलांचा तोंडचा घास हिस्कावला गेला आहे, शिवाय त्यांनी आपल्या मुलाला देखील गमावलं आहे. ही घटना हैदराबादची आहे. जिथे एका 22 वर्षीय मुलाला त्याचा ड्रिम जॉब मिळाला होता, ज्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि तो खूपच आनंदी झाले. अभिजित रेड्डी असे या तरुणाचे नाव आहे, त्याने B.Tech in Chemical Engineering हे NIIT मधून केलं होतं, ज्यामुळे त्याला लगेचच एका ऑईल कंपनीमध्ये 58 लाख वर्षाचा पगार होता. ज्यामुळे हा तरुण आणि त्याचे आईवडिल खूपच खुश होते. अभिजितला दुबईतल्या ऑईल कंपनीच्या हेडकॉर्टरमध्ये हा जॉब लागला होता. पहिल्याच पगारात इतका मोठ्या रकमेचा पगार मिळवणे, हे त्याच्यासाठी खूप मोठी अचिवमेंट होती. अभिजित पुढच्या महिन्यात दुबईला जाणार होता, परंतू अचानक हृदय विकाराचा झटक्यानं त्याचा मृत्यू झाला. ज्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचं डोंगर पडलं. हे वाचा : IAS Officer च्या दहावीची मार्कशिट का होतेय व्हायरल? ‘या’ गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चा त्याच्या कुटुंबीयांनी त्याला कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) दिला, त्यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात नेले, परंतू तेथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं. खरंतर एका 22 वर्षीय तरुणाला असा हार्ट अटॅक येणं हे फारच धक्कादायक आहे. हे वाचा : मुलीसाठी आईचा Desi Jugaad, सायकलवर बनवली ‘कारवाली सीट’, Video पाहून विश्वास बसणार नाही खरंतर सध्या तरुणांमध्ये हार्टअॅकचे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढलं असल्याचं डॉक्टर देखील सांगतात. खरंतर हे त्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतं. या तरुणांच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्पात ते आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, तसेच चिंता आणि तणाव यांचा देखील त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळ तरुण वयात लोकांना हार्ट अटॅक येतो. हे टाळण्यासाठी व्यायाम, चांगली झोप, योग्य आहार आणि तणाव रहित आयुष्याची गरज आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.