मुंबई 28 सप्टेंबर : भारतात गुगाडू लोकांची कमी नाही. येथे लोक आपल्या दररोजच्या वापरातील गोष्टींसंबंधीत देखील काही ना काही जुगाड करतात आणि आपले पैसे वापरतात. या जुगाडांपैकी काही जुगाड हे खरोखरंच कौतुकास्पद असतात. तर काही जुगाड हे बऱ्याचदा फसतात. पण ते काहीही असलं तरी जुगाडामध्ये भारतीयांचा हात कोणीही पकडू शकत नाहीत. यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जे पाहायला लोकांना फार आवडते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका महिलेनं आपल्या मुलीसाठी भन्नाट जुगाड केला आहे. हे वाचा : याचा गोंडसपणा आणि निरागसता तुम्हाला वेड लावेल, क्युट माकडाचा Video Viral खरंतर सायकलवरती सगळेच डबल सिट बसतात. एक चालक आणि दुसरा व्यक्ती त्याच्या पुढे किंवा मागे बसतो. पण या महिलेने व्हिडीओतील महिलेनं आपल्या मुलीला सायकलच्या मागे बसवण्यासाठी भलताच जुगाड केला. तिच्या या जुगाडाला लोक खूपच पसंत करत आहेत. या महिलेनं आपल्या मागे मुलाला तर बसवलं, परंतू त्याचा तोल जाऊ नये म्हणून त्याला लहान खूर्चीत बसवलं आणि ती खूर्ची सायकलच्या मागे बांधली. ज्यावर गादी म्हणून जाड चादर देखील घातली आहे. ज्यामुळे ही चिमुकली आपल्या आईच्या मागे बसून सायकल राइडचा आनंद घेत आहेत. जसे की ही चिमुकली कारच्याच सीटवर बसली आहे. हे वाचा : ट्रक झाला चालता फिरता लग्नमंडप, Video शेअर करण्यापासून आनंद महिंद्रा स्वत:ला रोखू शकले नाही अवघ्या 9 सेकंदाचा हा व्हिडीओ लोकांना फारच आवडला आहे. एका आईने आपल्या मुलासाठी केलेल्या जुगाडाचं कौतुक होत आहे, तर खरोखरं अशाप्रकारचा मुलांसाठी एखादा पर्याय असावा असं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
What a mother won’t do for her child 🥰🥰🥰 @ankidurg pic.twitter.com/TZWjHWAguS
— Harsh Goenka (@hvgoenka) September 26, 2022
हा व्हिडीओ Harsh Goenka यांनी आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, “आई आपल्या मुलासाठी काय करु शकत नाही?” आपल्या मुलाला सोबत ठेवता यावं किंवा प्रवास करता यावा यासाठी एका आईने केलेल्या या जुगाडाला 1.4 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज आणि लाईक, तसेच कमेंट्स आले आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही, पण खरोखरंच हा व्हिडीओ मनाला स्पर्श करणारा आहे.