जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एका हाताने सिगरेट ओढत दुसऱ्या हाताने पकडला साप; तरुणीचा हा VIDEO पाहून उडेल थरकाप

एका हाताने सिगरेट ओढत दुसऱ्या हाताने पकडला साप; तरुणीचा हा VIDEO पाहून उडेल थरकाप

एका हाताने सिगरेट ओढत दुसऱ्या हाताने पकडला साप; तरुणीचा हा VIDEO पाहून उडेल थरकाप

ही तरुणी सिगरेट ओढताना दिसते. तरुणी अगदी शांतपणे सापाजवळ जाते आणि आपली सिगरेट ओढत राहाते. यानंतर अगदी अचानक ती सापाचं तोंड पकडे आणि त्याला उचलून घेते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 18 मार्च : आजकाल सोशल मीडियावर वाईल्ड लाईफचे व्हिडिओ (Wild Life Videos) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात. यात सापाचे व्हिडिओ (Snake Videos) सर्वात जास्त पाहिले जातात. अनेक साप विषारी असल्याने लोक सहसा साप समोर दिसताच आपला रस्ता बदलतात. तर अनेकदा साप मानवी वस्तीत घुसल्यावर लोकांची घाबरगुंडी उडते. मात्र आता सापाचा जो व्हिडिओ समोर आला आहे, तो हैराण करणारा आहे. यात एक तरुणी खतरनाक सापाला अगदी सहज पकडताना दिसते. OMG! भलतीच हिंमत करून व्यक्तीने थेट मगरीला मारली मिठी अन्..; धडकी भरवणारा VIDEO सहसा साप आपल्या आसपास दिसला तरी कोणीही माणूस त्याच्यापासून दूर पळतो. याचं मुख्य कारण म्हणजे बहुतेक साप विषारी असतात. हे साप चावल्याने अनेकदा माणसाचा मृत्यूही होतो. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये युवती सिगरेट पित सापाला पकडताना दिसते. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

जाहिरात

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक साप रस्त्यावर पडलेला आहे. यामुळे रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांना त्रास होत असतो. इतक्यात अचानक एक तरुणी तिथे जाते. ही तरुणी सिगरेट ओढताना दिसते. तरुणी अगदी शांतपणे सापाजवळ जाते आणि आपली सिगरेट ओढत राहाते. यानंतर अगदी अचानक ती सापाचं तोंड पकडे आणि त्याला उचलून घेते.

कसं शक्य आहे? ड्रायव्हरशिवायच चालू लागली रिक्षा; विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO

सापाला हातात घेतल्यानंतर तरुणी त्याला रस्त्याच्या कडेला घेऊन जाते आणि सोडून देते. यानंतर लोक तिथून पुढे जाताना दिसतात. या तरुणीचं धाडस पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. व्हिडिओ ब्राझीलच्या जबोटिकटुबास येथील असल्याचं सांगितलं जात आहे. तर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीचं नाव जॅकली असं असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात