जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! भलतीच हिंमत करून व्यक्तीने थेट मगरीला मारली मिठी अन्..; धडकी भरवणारा VIDEO

OMG! भलतीच हिंमत करून व्यक्तीने थेट मगरीला मारली मिठी अन्..; धडकी भरवणारा VIDEO

OMG! भलतीच हिंमत करून व्यक्तीने थेट मगरीला मारली मिठी अन्..; धडकी भरवणारा VIDEO

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ज्या पद्धतीने एका मगरीला मिठी मारतो, ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 18 मार्च : मगर किती क्रूर आणि हिंस्त्र शिकारी आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मगरीच्या जबड्यात जर एखादा प्राणी अडकला तर त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. अगदी क्षणभरात हा जीव आपल्या शिकारीची चिरफाड करतो (Crocodile Attack). यामुळे म्हटलं जातं, की पाण्यात राहून मगरीसोबत दुश्मनी कधीच घेऊ नये. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल (Shocking Video of Crocodile) होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. बापरे! सापापेक्षाही विषारी आहे हा किडा; तोंड लावताच नागाचाही क्षणात मृत्यू व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ज्या पद्धतीने एका मगरीला मिठी मारतो, ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती जमिनीवर मगरीसोबत झोपलेला आहे. हे दृश्य खरोखरच हैराण करणारं आहे. कारण मगरीला पाहून जंगलातील मोठमोठे प्राणीही धूम ठोकतात. मात्र त्याच मगरीला एक व्यक्ती आरामात मिठी मारताना दिसत आहे.

जाहिरात

या व्यक्तीला पाहून असं म्हणता येऊ शकतं, की त्याला मगरीची अजिबातही भीती नाही. मगर आणि या व्यक्तीचा हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर jayprehistoricpets नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. युजरने या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जेव्हा डार्थ गेटोर (Darth Gator) बिग बॉय बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना खेळायची इच्छा होते.’ डार्थ कॅलिफोर्नियामधील अतिशय खतरनाक प्रजातीचा गेटोर आहे. याला पाळीव प्राणी म्हणून ठेवणं, बेकायदेशीर आहे.

एका हरणासाठी 6 सिंहांची आपसात झुंज! एकमेकांवर तुटून पडले अखेर…; VIDEO VIRAL

हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. काहीच तासांआधी शेअर झालेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 79 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा आकडा वाढतच आहे. याशिवाय अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, ही आश्चर्याची बाब आहे की डार्थ इतका क्यूट दिसत आहे. तर अनेकांनी असा सवाल केला आहे की हे पाळीव आहे का आणि जर ते आक्रमक असेल, तर त्याच्यापासून दूर राहायला हवं, असा सल्लाही दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात