न्यूयॉर्क, 12 डिसेंबर: चौदा महिन्यांच्या बाळानं जेव्हा पहिल्यांदा कुत्रा पाहिला, तेव्हा त्याची प्रतिक्रिया अशी काही होती, जी पाहून प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं. लहान मुलांसाठी जगातील अनेक गोष्टी नवीन असतात. आयुष्यात पहिल्यांदाच ज्या गोष्टी ते पाहतात, त्यावर त्यांची प्रतिक्रिया कमालीची असते. एखाद्या गोष्टीबाबत त्यांचं मत तयार होण्यापूर्वीच त्या गोष्टी त्यांना दिसत असल्यामुळे नैसर्गिक कुतुहल जागं होतं आणि त्या गोष्टींनी मुलं एक्साईट होताना दिसतात.
मुलाने पाहिला कुत्रा
या व्हिडिओत दिसणारा मुलगा आहे केवळ 1 वर्षं आणि 2 महिन्यांचा. Madeyousmile या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. फुटपाथवर उभ्या असणाऱ्या या बाळाला अचानक एक कुत्रा त्याच्या दिशेनं येताना दिसतो. त्याच्याकडे पाहून बाळ उल्हासित होतं आणि उड्या मारू लागलं. त्याचं कुतुहल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकायला लागतं.
14 month old kid seeing a dog for the first time pic.twitter.com/zTrfnAovlv
— Madeyousmile (@Thund3rB0lt) December 9, 2021
कुत्र्यासोबत धमाल
जेव्हा हा कुत्रा बाळाजवळ येतो, तेव्हा बाळाला अधिकच आनंद होतो. बाळ कुत्र्याच्या जवळ जाऊन त्याला निरखून पाहू लागतं. कुत्रादेखील बाळाकडे पाहत राहतो. काहीवेळानं कुत्रा बाळायला चाटण्यासाठी काहीसा पुढं येतो, त्यावर बाळ मागे सरकतं आणि पुन्हा कुत्र्यासोबत खेळत राहतं.
बाळाने घेतली लोळण
कुत्रा जेव्हा आडवा पडतो, तेव्हा बाळदेखील आडवं पडत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. कुत्र्यासोबतचा बाळाचा वेळ अत्यंत आनंदात जात असल्याचं पाहून आजूबाजूनं जाणारे नागरिकदेखील हा प्रसंग पाहत राहतात आणि खूश होतात.
हे वाचा- सर्जरी करून लावला दुसऱ्याचा प्रायव्हेट पार्ट; सांगितलं कसं आहे वैवाहिक जीवन
नेटकऱ्यांकडून कौतुक
बाळाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत असून त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 70 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर 500 पेक्षा अधिक जणांनी रिट्विट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Small baby, Viral video.