नवी दिल्ली 13 जानेवारी : जगभरात अनेक प्रकारचे साप आढळतात. एका अहवालानुसार असं सांगण्यात आलं आहे की, त्यापैकी काही सापच विषारी आहेत. इतर बहुतेक सापांमध्ये विष आढळत नाही. मात्र, यातील विषारी सापांची माहिती नसल्याने बहुतांश लोक सापांना मारतात. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर मदत करणारे काही लोक या सापांची सुरक्षित सुटका करताना दिसतात. Video : भरधाव कार थेट ट्रकखाली, पुढे जे घडलं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही साप देखील इतर सामान्य प्राण्यांप्रमाणेच असतात. जेव्हा त्यांना धोका वाटतो तेव्हाच ते मानवांवर हल्ला करतात. दुसरीकडे, सापांमध्ये आढळणारं विष मानवांनाही मारू शकतं. या कारणामुळे भीतीपोटी अनेक वेळा माणूस स्वतःला वाचवण्यासाठी सापांना मारतो. सध्या परिस्थिती बदलत असून, अनेक ठिकाणी घरांच्या आजूबाजूला साप दिसल्यावर स्थानिक लोक सापांना वाचवताना दिसतात.
नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक महिला सापाला वाचवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नाग फणा काढून बसला असल्याचं दिसतं. जे पाहून अंदाज बांधता येतो की हा नाग खूप प्राणघातक असू शकतो. मात्र समोर उभी असलेली मुलगी न घाबरता सापाला पकडून प्लास्टिकच्या डब्यात बंद करून त्याची सुटका करताना दिसत आहे. हे पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. ती ज्या पद्धतीने आणि जितक्या सहज या सापाला पकडते, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि… @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडिओला 25 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, 40 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी सापाला वाचवणाऱ्या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.