Home /News /viral /

VIDEO: बापरे! तरुणीनं एका हातानं पकडला विषारी साप, धाडसाचं होतंय कौतुक

VIDEO: बापरे! तरुणीनं एका हातानं पकडला विषारी साप, धाडसाचं होतंय कौतुक

एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. ही मुलगी एका हातानं साप पकडत (Young Girl Rescued Snake) असल्याचं पाहायला मिळतं.

  नवी दिल्ली 15 जून : साप हा एक असा जीव आहे ज्याचं नाव ऐकूनच अनेकांना घाम फुटतो. रस्त्यात चालत असतानाही आपल्याला साप दिसला तरी आपण आपला रस्ताच बदलून दुसरीकडून मार्ग शोधतो. मात्र, असेही अनेक लोक आहेत, ज्यांनी सापाची अजिबातही भीती वाटत नाही आणि ते अगदी सहजपणे सापांना आपल्या हातामध्ये उचलतात. अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. ही मुलगी एका हातानं साप पकडत (Young Girl Rescued Snake) असल्याचं पाहायला मिळतं. VIDEO: टोळीचा दिवसाढवळ्या दुकानदारावर गोळीबार, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला गेला आहे. व्हिडिओमध्ये ही तरुणी न घाबरता अत्यंत धाडसानं हा साप आपल्या हातात पकडताना दिसते. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या तरुणीचं नाव नागेश्वरी आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हा साप एका कोपऱ्यात बसलेला आहे. इतक्यात ही तरुणी तिथे येतो आणि सहजपणे या विषारी सापाला हातात पकडते.
  VIDEO: वरातीसाठी आणलेल्या हत्तीचा लग्नात तुफान राडा; गाड्यांचा केला चुराडा हा साप हातात पकडल्यानंतर तरुणीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतं. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत व्हिडिओ 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर लोक या तरुणीचं धाडस पाहून हैराण झाले आहेत. अनेकांनी तिच्या धाडसाचं कौतुक करत तिला सवाल केला आहे, की तुला सापांची भीती वाटत नाही का? व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Snake video

  पुढील बातम्या