जाहिरात
मराठी बातम्या / देश / वरातीसाठी आणलेल्या हत्तीनं लग्नाचा केला सत्यानाश; पाहुण्यांच्या गाड्यांचा चुराडा करतानाचा VIDEO व्हायरल

वरातीसाठी आणलेल्या हत्तीनं लग्नाचा केला सत्यानाश; पाहुण्यांच्या गाड्यांचा चुराडा करतानाचा VIDEO व्हायरल

वरातीसाठी आणलेल्या हत्तीनं लग्नाचा केला सत्यानाश; पाहुण्यांच्या गाड्यांचा चुराडा करतानाचा VIDEO व्हायरल

VIRAL VIDEO: लग्नात वरातीसाठी आणलेल्या हत्तीनं तांडव करून संपूर्ण लग्नाचा सत्यानाश (elephant ruined whole marriage) केला आहे. संतापलेल्या हत्तीनं मंडपाची नासधूस करत पाहुण्यांच्या गाड्यांचा चुराडा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

प्रयागराज, 15 जून: पोराचं किंवा पोरीचं लग्न (Marriage) धुमधडाक्यात झालं पाहिजे, अशी अनेक आई वडिलांची इच्छा असते. मुलांच्या शिक्षणाला जेवढा पैसा खर्च करत नाहीत, त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट पैसा लग्नासाठी खर्च केला जातो. भारतात बहुतांशी ठिकाणी असंच चित्र पाहायला मिळतं. अशाच एका धुमधडाक्यात झालेल्या लग्नात हत्तीनं तांडव करून संपूर्ण लग्नाचा सत्यानाश (elephant ruined whole marriage) केला आहे. संतापलेल्या हत्तीनं मंडपाची नासधूस करत पाहुण्यांच्या गाड्यांचा चुराडा केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल (Viral Video) होतं आहे. खरंतर लग्नात वाजवलेल्या फटाक्यांच्या आवाजामुळे संतापलेल्या हत्तीनं या लग्नाचा पुर्णपणे फज्जा उडवला आहे. यामुळे नवरदेवाला देखील जीव मुठीत घेऊन पळावं लागलं आहे. या घटनेनं विवाहस्थळी बराच वेळ गोंधळ झाला होता. या घटनेत हत्तीने अनेक महागड्या गाड्यांचा चुराडा केला आहे. त्यामुळे पाहुण्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे. संबंधित उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील सराय इनायत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्मापूर याठिकाणी घडली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पण या दुर्घटनेच वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेत हत्तीच्या माहुताचा मृत्यू झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पण याबाबतची अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.

जाहिरात

हे ही वाचा- माहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर सराय इनायत पोलीस ठाण्याचे एसएचओ राकेश चौरसिया यांनी सांगितलं की, ‘जेव्हा वराचं आणि पाहुण्यांचं स्वागत केलं जात होतं. त्यावेळा काही तरुणांनी मोठ्या आवाजात फटाके फोडले. बराच वेळ सुरू असलेल्या या फटाक्यांच्या आवाजामुळे वरातीसाठी आणलेला हत्ती बिथरला. यानंतर संतापलेल्या हत्तीनं लग्न मंडपात दिसेल त्या गोष्टींवर धावा बोलायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीला पायाखाली चिरडण्यास सुरुवात केली. या दुर्दैवी घटनेत जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात