मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: उत्साहाच्या भरात खुर्चीवर चढून नाचू लागला; पुढच्याच क्षणी असा आपटला की सगळेच शॉक

VIDEO: उत्साहाच्या भरात खुर्चीवर चढून नाचू लागला; पुढच्याच क्षणी असा आपटला की सगळेच शॉक

काही मुलं एका खास प्रसंगी आनंदाने नाचत आहेत. परंतु या दरम्यान एक तरुण वेगळ्याच लेवलला जात मजा करत आहे.

काही मुलं एका खास प्रसंगी आनंदाने नाचत आहेत. परंतु या दरम्यान एक तरुण वेगळ्याच लेवलला जात मजा करत आहे.

काही मुलं एका खास प्रसंगी आनंदाने नाचत आहेत. परंतु या दरम्यान एक तरुण वेगळ्याच लेवलला जात मजा करत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 25 मार्च : सोशल मीडियाने संपूर्ण जगावर आपली विलक्षण छाप सोडली आहे. इथे व्हायरल होणारे अनेक व्हिडिओ मजेदार असतात, तर अनेक धक्कादायक असतात. लाईक्स आणि व्ह्यूजच्या शर्यतीत लोक इंटरनेटवर काहीही शेअर करत राहतात. पण अनेक वेळा सोशल मीडिया स्क्रोल करत असताना आपली नजर अशा पोस्ट्सवरही जाते, ज्या पाहिल्यानंतर आपल्याला हसू आवरता येत नाही. अशीच एक पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होत आहे. जी पाहिल्यानंतर तुम्हाला हसूही येईल आणि हेदेखील समजेल की अधिक स्टंट किंवा मस्ती करणं कधीकधी अतिशय धोकादायकही ठरू शकतं.

बापरे! काकांनी डान्स करताना थेट स्वतःच्याच खांद्यावर ठेवला पाय; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'खतरनाक'

अनेकदा जेव्हा मित्र एकत्र मजा करायला बसतात तेव्हा ते विसरतात की आजूबाजूला काय आहे आणि काय नाही. त्यामुळे अनेकदा आपण लोकांमध्ये विनोदाचा विषय बनतो आणि जेव्हा असे व्हिडिओ शेअर केले जातात तेव्हा ते पाहिले जात नाहीत तर खूप शेअरही केले जातात. आता व्हायरल झालेल्या क्लिपमध्येच पाहा, जिथे काही मुलं एका खास प्रसंगी आनंदाने नाचत आहेत. परंतु या दरम्यान एक तरुण वेगळ्याच लेवलला जात मजा करत आहे. पण त्याची मजा फार काळ टिकत नाही आणि थोड्यावेळाने तो स्वतःच धाडकन खाली कोसळतो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, 'उड जाईये रे कबूतर' हे गाणं बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे आणि गाण्यानुसार डान्सही सुरू आहे. मात्र त्यातील एकजण चादर घेऊन खुर्चीवर उभा राहून नाचत आहे. तीन जण खाली उभे राहून नाचत असताना एक मुलगा मात्र उत्साहाच्या भरात खुर्चीवर उभा राहून नाचू लागला. यादरम्यान त्याचं संतुलन बिघडलं आणि तो थेट तोंडावर पडला.

हा व्हिडिओ 'Hasna Zaroori Hai' नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडिओ 24 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Dance video, Funny video, Video Viral On Social Media