जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! काकांनी डान्स करताना थेट स्वतःच्याच खांद्यावर ठेवला पाय; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'खतरनाक'

बापरे! काकांनी डान्स करताना थेट स्वतःच्याच खांद्यावर ठेवला पाय; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'खतरनाक'

बापरे! काकांनी डान्स करताना थेट स्वतःच्याच खांद्यावर ठेवला पाय; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'खतरनाक'

एका विचित्र नृत्याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये एक नेपाळी व्यक्ती योग प्रकारचं नृत्य करताना दिसला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 25 मार्च : लग्नाचं वातावरण असं असतं, की इथे लोक आपला आनंद व्यक्त करण्यासाठी मनापासून नाचताना दिसतात. अनेक जण लग्नसोहळ्यात अशा पद्धतीने नाचतात की असा डान्स तु्म्ही याआधी कधीही पाहिला नसेल. अशाच एका विचित्र नृत्याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये एक नेपाळी व्यक्ती योग प्रकारचं नृत्य करताना दिसला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. VIDEO: लग्नाचे विधी सुरू असतानाच स्टेजवर माकडाची एन्ट्री; आधी नवरदेवाच्या डोक्यावर बसलं, मग नवरीला.. सध्या सोशल मीडियावर नेपाळी आजोबांच्या तुफानी डान्सचा हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. लग्नात सहभागी झालेले हे काका इतरांना नाचताना पाहून स्वत:ला रोखू शकले नाहीत आणि पूर्ण उत्साहात डान्स स्टेप्स करू लागले. त्यांचा डान्स ज्याने पाहिला तो थक्क झाला. व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर काही युजर्सनी या व्यक्तीला बाबा रामदेव यांच्यासाठी चॅलेंज असल्याचंही म्हटलं आहे. तुम्हीही बघा, या काकांनी असं काय केलं की त्यांच्याबद्दल खूप चर्चा सुरु झाल्या आहेत.

जाहिरात

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कार्यक्रमात घरातील महिला आणि इतर पाहुणे नाचत आहेत. सर्वांना नाचताना पाहून तिथे उपस्थित काकाही उत्साहाने पुढे येतात. यानंतर काकांनी असा धमाल डान्स केला की हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, नेपाळी काकांच्या तुफानी डान्स स्टेप्स पाहून तिथे उपस्थित असलेल्या काही महिलाही हसू लागल्याचं दिसतं.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडिओमध्ये या काकांनी उत्साहात थेट आपला पाय स्वतःच्याच खांद्यावर ठेवत जबरदस्त डान्स केला आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्हालाही हा मजेदार डान्स व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. सोशल मीडियावर हा डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांचीही मनं जिंकत आहे. आतापर्यंत 77 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात