नवी दिल्ली 24 मार्च : भारतीय विवाहात प्रथा पारंपारिक पद्धतीने पार पाडल्या जातात आणि प्रत्येक राज्यात या विवाहात वेगवेगळी झलक पाहायला मिळते. लग्न समारंभासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येतं आणि नियोजित दिवसाच्या खूप आधीच तयारी सुरू करतं. जेणेकरून हा दिवस कोणत्याही अडथळ्याशिवाय खास बनवता येईल. मात्र अनेकदा लग्नात अशा काहीतरी मजेशीर घटना घडतात, ज्या नवरी आणि नवरदेवासोबतच उपस्थित पाहुण्यांच्याही आयुष्यभर लक्षात राहतात.
स्टेजवर हार घालताना नवरदेवाची उतरली पॅन्ट, नववधूची भन्नाट रिएक्शन की... पाहा व्हिडीओ
सध्या अशाच एका लग्नातील मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात लग्नाचे विधी सुरू असताना अचानक न बोलावलेल्या एका पाहुण्याची म्हणजेच माकडाची एन्ट्री झाली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरी आणि नवरदेव दोघंही मंडपात बसून लग्नाचे विधी पार पाडत आहेत. हे दोघंही एकमेकांच्या डोक्यावर धान्याचे दाणे टाकत आहेत. मात्र, हे सगळं सुरू असतानाच अचानक तिथे एका माकडाची एन्ट्री होते.
View this post on Instagram
आता एकाजागी शांत बसेल ते माकड कसलं. हे माकड मंडपात एन्ट्री करताच नवरदेवाच्या डोक्यावर चढतं आणि त्याच्या डोक्यावर ठेवलेलं धान्य घेण्याचा प्रयत्न करतं. हे माकड एवढ्यावरच थांबत नाही, तर पुढे जाऊन ते नवरीच्याही डोक्यावर चढून धान्य ओढतं. माकडाचं हे कृत्य पाहून नवरी नवरदेवही सुरुवातीला गोंधळतात. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
नवरी आणि नवरदेव आपल्या लग्नातील हा मजेशीर क्षण आयुष्यभर विसरणार नाहीत, हे मात्र नक्की. हा व्हिडिओ एका तेलुगू लग्नातील असल्याचं म्हटलं जात आहे. Telugu beats नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत असून मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आहे. आतापर्यंत 2 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Funny video, Wedding video