जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अजबच आहे! शरीरावर एक Magic number लिहिल्याने छुमंतर होते कोणतीही समस्या; तरुणाचा विचित्र उपाय

अजबच आहे! शरीरावर एक Magic number लिहिल्याने छुमंतर होते कोणतीही समस्या; तरुणाचा विचित्र उपाय

अजबच आहे! शरीरावर एक Magic number लिहिल्याने छुमंतर होते कोणतीही समस्या; तरुणाचा विचित्र उपाय

काही विशिष्ट अंक, विशिष्ट रंगांनी, शरीराच्या विशिष्ट भागावर लिहिल्यानंतर जी इच्छा व्यक्त केली जाते ती पूर्ण होते, असं दावा केला जातो आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    लंडन, 29 ऑक्टोबर : अंधश्रद्धा (Superstition) म्हणा किंवा आणखी काही, पण नशीब उजळावं आणि पैसा मिळावा किंवा कोणत्याही समस्येपासून मुक्ती हवी यासाठी काही लोक काही विचित्र गोष्टी करण्यासाठी लगेचच तयार होतात. सध्या बरेच लोक सोशल मीडियावरील (Social Media) मॅजिकल ट्रेंडच्या (Magical Trend) मागे धावताना दिसत आहेत. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी  या मॅजिकल ट्रेंडमध्ये शरीरावर काही अंक (Numbers) क्रमवारीत लिहिले जातात (Magical Numbers on body) . असं केल्यानं आयुष्यात (Life) सकारात्मक बदल (Positive Changes) झाल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. ही एक बाजू असली तरी हा ट्रेंड धोकादायक ठरू शकतो असंही काही लोक म्हणतात. टिकटॉकवर (TikTok) Benjamin_Hanz या युझरनं असा दावा केला आहे, की काही अंक, विशिष्ट रंगांनी, शरीराच्या विशिष्ट भागावर लिहिल्यानंतर जी इच्छा व्यक्त केली जाते, ती पूर्ण होते. या ट्रेंडनुसार एकूण 15 भिन्न संख्या क्रम दिले जातात. प्रत्येक क्रमासाठी विशिष्ट असा रंग (Color) निश्चित केलेला असतो आणि या रंगामुळे होणारे फायदेही वेगवेगळे आहेत. हे वाचा -  ‘हे मॅजिक ऑईल लावताच तुमच्याकडे येईल पैसा’, महिलेचा दावा; VIDEO सुद्धा शेअर केला या विचित्र टेंड्रमध्ये एकूण 15 श्रेणींमध्ये संख्यांची विभागणी करण्यात आली आहे. यात चांगली झोप, तणावमुक्ती, प्रेम, वजन कमी करणं, आरोग्यात सुधारणा, नवे मित्र, चांगली त्वचा, सौंदर्य, सौभाग्य, लांबसडक केस, पैसे, सेक्स, तसंच समस्या दूर करणं आणि चांगलं जीवन अशा श्रेणींचा समावेश आहे. बेंजामिनचा या संदर्भातील व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  हा संख्या क्रम मनगटाशिवाय शरीराच्या अन्य कोणत्याही अवयवावर लिहावा. हा संख्या क्रम लिहिण्यासाठी पेन, मार्करचा वापर करता येईल,असं पहिल्या व्हिडिओत बेंजामिननं स्पष्ट केलं आहे. दुसऱ्या व्हिडीओत बेंजामिनने कोणती संख्या कुठल्या अवयवावर लिहिली तर त्याचा काय फायदा होतो, हे स्पष्ट केलं आहे. हे वाचा -  डासांचा खात्मा करणारं Penis mushroom; यावर बसताच मरतात डास त्वचेवर जादुई अंक लिहिण्याचं शास्त्र खरं तर समजण्यापलीकडं आहे. परंतु तरीही अनेक लोकांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. काही लोकांनी असं केल्यानं फायदा झाल्याचं सांगितलं आहे तर काही लोकांनी हे धोकादायक ठरू शकतं असं मत व्यक्त केलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात