मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

डासांचा खात्मा करणारं Penis mushroom; यावर बसताच मरतात Mosquitoes

डासांचा खात्मा करणारं Penis mushroom; यावर बसताच मरतात Mosquitoes

या पेनिस मशरूमकडे (Penis mushroom) डास आकर्षित होतात आणि तिथंच नष्ट होतात.

या पेनिस मशरूमकडे (Penis mushroom) डास आकर्षित होतात आणि तिथंच नष्ट होतात.

या पेनिस मशरूमकडे (Penis mushroom) डास आकर्षित होतात आणि तिथंच नष्ट होतात.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 27 ऑक्टोबर :  सध्या डेंग्यूची (Dengue) प्रकरणं वाढताना दिसत आहेत. डासांपासून होणारा हा आजार (Dengue Mosquitoes). त्यामुळे डासांपासून बचाव करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. अशात आता डासांचा खात्मा करणारं पेनिस मशरूम (Penis Mushroom) चर्चेत आलं आहे. या पेनिस मशरूमकडे डास आकर्षित होतात आणि त्यावर बसताच ते मरतात (Penis Mushroom kills Mosquitoes)

पेनिस मशरूमला शास्त्रीय भाषेत फॅलस रुबिकंडस (Phallus rubicundus) म्हणतात. कवक म्हणजे फंगसची ही एक प्रजाती. जी स्टिंकहॉर्न फॅमिलीतील (Stinkhorn Family) आहे. याचा आकार अगदी पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टसारखच आहे. पावसाळ्यानंतर अनेक देशांमध्ये असे मशरूम उगवले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर हे चर्चेत आहे.  सायन्स अलर्टने आपल्या सोशल मीडियावर याचा फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by ScienceAlert (@sciencealert)

1811 साली या मशरूमचा शोध लागला. याची उंची जास्तीत जास्त 15 ते 18 सेंटीमीटर असते. याचा वरील भाग जवळपास 1.2 इंच व्यासाचा असतो.  सामान्यपणे उष्णकटिबंधीय देशांमध्ये याची वाढ होते. भारतात भरिया (Bharia) आणि बैगा (Baiga)  आदिवासींमध्ये हे खूप प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशातील आदिवासी समाज याला झिरी पिहिरी (jhiri pihiri) म्हणतात.

हे वाचा - स्वप्नातील राजकुमार मिळाला पण...; प्रायव्हेट पार्टमुळे तिने केलं ब्रेकअप

आदिवासी लोक या मशरूमचा उपयोग टाइफॉईड आजारात आणि प्रेग्नंट महिलांसाठी करतात. गर्भवती महिलांना प्रसूती वेदनांदरम्यानही हे दिलं जातं. यामुळे टाइफॉईडचा ताप बरा होतो असं मानलं जातं. साखरेसोबत कुटून ते सुकवलं जातं. त्यानंतर प्रेग्नंट महिला किंवा टाइफॉईड रुग्णंना दिवसातून तीन वेळा एक-एक चमचा दिलं जातं.  भारतातच नाही तर ऑस्ट्रेलियातील आदिवासीही याचा एफ्रोडिजिएक (aphrodisiac) म्हणजे लैंगिक शक्ती वाढवणारं औषध म्हणून वापर करतात.

हे वाचा - Dengue: सावधान! विशिष्ट वेळी आणि ठराविक ठिकाणी चावतात डेंग्यूचे डास

याचा दुर्गंध खूप खतरनाक असतो. याच्या वरच्या भागातून हा दुर्गंध येत असतो. या दुर्गंधीकडे डासांसारखे कीटक आकर्षिक होतात आणि तिथं बसताच दुर्गंधीमुळेच ते नष्ट होतात. त्यामुळे काही देशातील शास्त्रज्ञ या मशरूममधील या दुर्गंधयुक्त रसायनाचा वापर बायोकंट्रोल एंजेट म्हणून करायचा विचार करत आहेत. जेणेकरून डासांपासून होणाऱ्या आजारांपासून बचाव करता येईल.

First published:

Tags: Health, Lifestyle