मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अजबच! 'हे Magic oil लावताच तुमच्याकडे येईल पैसा', महिलेचा दावा; VIDEO सुद्धा शेअर केला

अजबच! 'हे Magic oil लावताच तुमच्याकडे येईल पैसा', महिलेचा दावा; VIDEO सुद्धा शेअर केला

पैशांसाठी हे जादुई तेल कसं तयार करायचं आणि कसं वापरायचं हेसुद्धा महिलेने सांगितलं आहे.

पैशांसाठी हे जादुई तेल कसं तयार करायचं आणि कसं वापरायचं हेसुद्धा महिलेने सांगितलं आहे.

पैशांसाठी हे जादुई तेल कसं तयार करायचं आणि कसं वापरायचं हेसुद्धा महिलेने सांगितलं आहे.

लंडन, 28 ऑक्टोबर : पैशांचं (Money) एखादं झाड असतं तर, आकाशातून पावसासारखे पैसे पडले (Earning money) असतात किंवा पैसे मिळवण्याचा एखादा मंत्र असता तर... पैशांबाबतचे (Money Earning Tips) असे विचार कधी ना कधी आपल्यापैकी काही जणांच्या मनात आलाच असेल (Magic Trick to Earn Money) . पण आपल्यालाही हे माहिती आहे की प्रत्यक्षात हे शक्य नाही. पण एका महिलेने मात्र असं जादुई तेल (Magic oil for money) तयार केलं आहे, जे लावताच पैसाच तुमच्याकडे येईल असा असा दावा तिने केला आहे.

टिकटॉकवर (TikTok) प्रसिद्ध असलेली जादूगार सीराने (Seirra)  पैसा मिळवण्यासाठी मॅजिक ऑईल तयार केलं आहे. या तेलामुळे पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल, तुमच्याकडे पैसा येईल आणि टिकेलसुद्धा असा दावा तिने केला आहे. इतकंच नव्हे तर तिने या तेलाची रेसिपी आणि हे तेल कसं वापरायचा याचा व्हिडीओ आपल्या @theintuitivewitchh टिकटॉक अकाऊंटवर शेअर केला आहे.

हे वाचा - सत्ता, राजेशाहीवर पाणी सोडत 'या' देशाची राजकुमारी राहणार वन-बीएचकेमध्ये!

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, सीराने एक बाटली घेतली, अगरबत्ती पेटवून ती तिने पवित्र करून घेतली. त्यानंतर त्यामध्ये जेड क्रिस्टल्स आणि त्यानंतर क्रिसँथेमम फ्लॉवर टाकले. सर्वात वर तिने काही दालचिनीचे तुकडे टाकले. हे पोशन द्राक्षाचं तेल किंवा स्वीट ऑरेंज किंवा लवंगाच्या तेलात बनवलं जातं. यामध्ये तुळशीची पानंही टाकली जातात. तेल टाकल्यानंतर तिने बाटली बंद केली.

सीराने सांगितल्यानुसार हे तेल मनगट किंवा मानेवर लावायचं, ज्यामुळे पैसे तुमच्याकडे आकर्षित होती. इतकंच नव्हे तर तुम्ही तुमचे पैसे, क्रेडिट-डेबिट कार्टवरही हे तेल लावा असा सल्ला तिने दिला आहे.

हे वाचा - कसं शक्य आहे? म्हणे, 'जितका जास्त खर्च तितकी जास्त पैशांची बचत', महिलेची विचित्र Saving Tips

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार अशा पद्धतीच्या पोशनमुळे हे माइंडसेट तयार होतो की तुम्हाला पैसे हवे आहेत. तुम्ही जसा पुन्हा पुन्हा विचार कराल तसंच होईल, असं मॅनिफेस्टेशन कोच इनबाल होनिंगमॅन यांनीही सांगितलं.

First published:

Tags: Lifestyle, Money, Tiktok, Viral