नवी दिल्ली 18 मार्च : जगात अनेक लोक असे असतात, ज्यांची उंची अतिशय कमी असते आणि त्यांना सतत असं वाटत राहातं की त्यांची उंची जास्त पाहिजे होती. मात्र अनेक लोक असेही असतात, ज्यांची हाईट इतकी जास्त असते, की त्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असंच काहीसं जगातील सगळ्यात उंच मॉडेलसोबतही होत आहे. ती इतकी उंच आहे, की तिला एका अजब समस्येचा सामना करावा लागत आहे.
कसं शक्य आहे? ड्रायव्हरशिवायच चालू लागली रिक्षा; विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO
रशियाची रहिवासी असलेली इकाटेरिना लिसिना हिची उंची फक्त रशियामध्येच नाही, तर जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या उंचीमुळे तिच्या नावी वर्ल्ड रेकॉर्डही आहे (Guinness World Record). इकाटेरिनाची उंची 6 फूट 9 इंच आहे. तिला जगातील सर्वात लांब मॉडेल म्हणून ओळखलं जातं (Tallest Model in World). याशिवाय तिच्या नावे आणखी एक अजब गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही आहे.
इकाटेरिनाचे पाय जगात सर्वात लांब आहेत. तिच्या पायांची लांबी 4 फूट 3 इंच आहे. याच कारणामुळे तिचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. इकाटेरिना आधी प्रोफेशनक फूटबॉल खेळाडू होती आणि तिने 2008 साली ऑलम्पिक गेम्समध्ये बॉन्ज मेडलही जिंकलं होतं. मात्र नंतर तिने रिटायरमेंट घेतली आणि मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवलं.
एका हरणासाठी 6 सिंहांची आपसात झुंज! एकमेकांवर तुटून पडले अखेर...; VIDEO VIRAL
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, तिने आपल्याला येणाऱ्या एका मोठ्या समस्येचा खुलासा केला. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने आपल्या रोमँटिक लाईफबद्दल खुलासा केला. तिने सांगितलं की तिच्या उंचीमुळे तिला चांगला मुलगाही मिळत नाही. तिच्या म्हणण्यानुसार, प्रेमात खरं तर उंचीचा काहीही फरक पडत नाही. मात्र लोक त्या कपलकडे वाईट नजरेने पाहातात, ज्यात स्त्री उंच आणि पुरुष ठेगंणा असतो. यामुळे ती स्वतःपेक्षा एक फूटापर्यंत उंची कमी असलेल्या व्यक्तीला डेट करायला तयार असते, मात्र त्यापेक्षा कमी उंचीच्या नाही. तिने सांगितलं की तिला पार्टी करायला जास्त आवडत नाही. यामुळे ती डेटिंग अॅपवरच मुलांना भेटण्यास प्राधान्य देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Model, Viral news, World record