मराठी बातम्या /बातम्या /Viral /

एका हरणासाठी 6 सिंहांची आपसात झुंज! एकमेकांवर तुटून पडले अखेर...; काय घडलं पाहा VIDEO

एका हरणासाठी 6 सिंहांची आपसात झुंज! एकमेकांवर तुटून पडले अखेर...; काय घडलं पाहा VIDEO

एका हरणासाठी सहा-सहा सिंह झाडावर चढले आणि आपसात लढू लागले.

एका हरणासाठी सहा-सहा सिंह झाडावर चढले आणि आपसात लढू लागले.

एका हरणासाठी सहा-सहा सिंह झाडावर चढले आणि आपसात लढू लागले.

    मुंबई, 17 मार्च : कळपाने शिकार करणाऱ्या सिंहांना (Lion) तुम्ही पाहिलं आहे. अशाच एका शिकारावर सिंह (Lion video) अक्षरश: तुटून पडले आहेत, तेसुद्धा झाडावर. एका शिकारासाठी सिंहांची आपसात झुंज झाली आहे. झाडावरच चक्क सहा सिंह एका शिकारावर टपून बसले आहेत (Lion fighting video) . एका शिकारावर सहा सहा सिंह दावेदार म्हणून हजर झाले. एका हरणासाठी ते एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले आहेत. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. natureismetal नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता झाडावर एक सिंह एका मृत हरणाला घेऊन दिसतो आहे. सिंहाने एका हरणाची शिकार केली. पण त्या एका हरणाला खाण्यासाठी तब्बल सहा सिंह हजर झाले. हे वाचा - शांत उभ्या असलेल्या गाईला कारणाशिवाय मारली काठी, दुसऱ्याच क्षणी हवेत उडाले आजोबा; नेमकं काय घडलं पाहा VIDEO एका सिंहाने हरणाची शिकार केली आणि इतर सिंहांपासूनच आपली शिकार वाचवण्यासाठी सिंह झाडावर चढला. त्यानंतर एकेएक करत चार सिंह झाडावर चढले कुणी हरणाचं डोकं आपल्या जबड्यात धरलं आहे, तर कुणी पाय. झाडाखाली आणखी दोन सिंह टपून बसले आहेत.
    झाडावर शिकार मिळवण्याच्या झटापटीत ते हरण झाडावरून धाडकन जमिनीवर कोसळतं. त्यानंतर सिंह पळत येत त्याभोवती जमा होतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Deer, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या