मराठी बातम्या /बातम्या /Viral /जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा: 655 कोटींचा मालक, लाइफस्टाइल सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही

जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा: 655 कोटींचा मालक, लाइफस्टाइल सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही

व्हायरल

व्हायरल

घरातील पाळीव कुत्र्यालाही अनेजण घरातील एखाद्या सदस्याप्रमाणेच वागवतात. त्यांच्या खाण्याची राहण्याची विशेष काळजी घेतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : बरेच लोक आपल्या घरात पाळीव प्राणी पाळताना दिसतात. खास करुन कुत्रा. वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे घरात पाळत असून त्यांच्यावर भरपूर प्रेमाचा वर्षावही करतात. घरातील पाळीव कुत्र्यालाही अनेजण घरातील एखाद्या सदस्याप्रमाणेच वागवतात. त्यांच्या खाण्याची राहण्याची विशेष काळजी घेतात. अनेकजण तर आपल्या पाळीव प्राण्यांसाठी काहीही करायला तयार असतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला असून एक व्यक्ती आपल्या कुत्र्यासाठी कोटींची संपत्ती सोडून गेला आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

कुत्रा करोडपती झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? निदान भारतात तरी तुम्ही असा प्रकार पाहिला नसेल किंवा ऐकला नसेल. आता कुत्र्यांकडेही कोट्यवधींची संपत्ती, मोठमोठ्या गाड्या, बंगले, नोकरदार होऊ लागले आहेत. असाच एका कुत्र्याविषयी तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्याकडे चक्क 655 कोटी कोटींची संपत्ती आहे.

हेही वाचा -  14 कोटी महिन्याचा खर्च; तरुण दिसण्यासाठी काय काय करतेय ही व्यक्ती?

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जर्मन शेफर्ड प्रजातीचा हा कुत्रा पॉप स्टार मॅडोनाच्या पूर्वीच्या घरात राहतो आणि आलिशान जीवन जगत आहे. त्याची लोकप्रियता एवढी झाली आहे की, लवकरच त्याच्या जीवनावर बनलेला 'गुंथर मिलियन्स' ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. गुंथर VI शी संबंधित अनेक धक्कादायक माहिती या माहितीपटात सांगण्यात आली आहे. यामध्ये कुत्र्याच्या मालमत्तेव्यतिरिक्त कुत्र्याने ही संपत्ती कशी कमावली हे देखील सांगितले आहे.

या कुत्र्यावर डॉक्युमेंट्री बनवणारे डायरेक्टर ऑरेलियन लेटरजी सांगतात की, त्याची गोष्ट खरोखरच धक्कादायक आहे. कुत्रा इतका श्रीमंत कसा असू शकतो हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. अधिकाधिक लोकांना या कुत्र्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. त्यामुळेच या माहितीपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिपोर्टनुसार, या कुत्र्याला जर्मन काउंटेस कार्लोटा लीबेन्स्टीन यांच्याकडून इतकी संपत्ती वारसाहक्काने मिळाली होती. लीबेन्स्टाईनचा मुलगा गुंथरने आत्महत्या केली होती आणि त्याला वारस नव्हता. अशा परिस्थितीत, 1992 मध्ये मृत्यूपूर्वी त्यांनी एक ट्रस्ट तयार केला आणि आपल्या लाडक्या कुत्र्यासाठी 6.5 अब्ज रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता सोडली. चित्रपटात सांगितले आहे की गुंथर VI एका इटालियन फार्मास्युटिकल कंपनीचा मालक देखील आहे.

दरम्यान, असाही कुत्रा आहे ज्याच्याकडे कोटींची संपत्ती आहे हे ऐकून अनेकजण थक्क आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी कायमच चर्चा पहायला मिळते.

First published:

Tags: Dog, Lifestyle, Viral, Viral news