मराठी बातम्या /बातम्या /Viral /14 कोटी महिन्याचा खर्च; तरुण दिसण्यासाठी काय काय करतेय ही व्यक्ती?

14 कोटी महिन्याचा खर्च; तरुण दिसण्यासाठी काय काय करतेय ही व्यक्ती?

व्हायरल

व्हायरल

जसं जसं वय वाढत जातं तसं म्हातारपण जवळ येतं. आजकाल लोक तरुण दिसण्यासाठी आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 30 जानेवारी :  जसं जसं वय वाढत जातं तसं म्हातारपण जवळ येतं. आजकाल लोक तरुण दिसण्यासाठी आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करतात. वृद्धपण कमी करण्यासाठी लोक निरनिराळ्या पद्धती वापरताना दिसतात. अशातच 45 वर्षीय व्यक्तीने स्वःताला तरुण ठेवण्यासाठी कोटी रुपये खर्च केल्याचं समोर येत आहे. यासाठी तो नक्की काय करतो याविषयी जाणून घेऊया.

45 वर्षीय अल्ट्रावेल्थ सॉफ्टवेअरचा मालक जॉन्सन त्याचं वय कमी करण्यासाठी काय करतो हे पाहुया. जॉन्सनकडे त्याचं वय कमी करण्यासाठी 30 पेक्षा जास्त वैद्यकीय तज्ञ आहेत. हे सर्व तज्ञ जॉन्सनच्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. या वैद्यकीय टीमचे लीडर ऑलिव्हर झोलमन आणि त्यांच्या टीमने जॉन्सनच्या सर्व अवयवांमध्ये वृद्धत्व कमी करण्याच्या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. जॉन्सनने या वर्षी त्याच्या शरीरावर 163 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे.

हेही वाचा -  Viral Video : स्टेजवरच नवरीच्या गालासोबत खेळू लागला तरुण, रागाच्या भरात नवरदेवाने....

हे सर्व पैसै तो मूत्राशय, पुरुषाचे जननेंद्रिय, गुदाशय, मूत्राशय, हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड, टेंडन्स, त्वचा आणि दात यावर खर्च करणार आहे. झोलमन आणि टीम एकत्रितपणे या सर्व अवयांवर काम करत जॉन्सनच्या वृद्धपण कमी होण्यावर काम करत आहेत. जॉन्सनचं वय कमी करण्यावर टीम गेली एक वर्ष मेहनत घेतेय. जॉन्सनला त्यांच्या आहारासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते आणि नियमांचं पालनही करावं लागतं. 1, 977 व्हेज कॅलरीज, दररोज एक तास व्यायाम, दररोज रात्री एक वेश विश्रांती, दोन तासांनी विशेष प्रकारचा चष्मा घालावा लागतो.

दरम्यान, दर महिन्याला तो डझनभर वैद्यकीय प्रक्रियाही करतो. या उपचारांच्या परिणामांवर नंतर रक्त चाचण्या, एमआरआय, अल्ट्रासाऊंड आणि कोलोनोस्कोपीद्वारे परीक्षण केले जाते. जॉन्सन 20 विविध औषधे आणि पूरक आहार वापरतो. विशेष म्हणजे जॉन्सन जीन थेरपीसह आणखी काही प्रायोगिक ऑपरेशन्स करणार आहेत. बरं, आम्हाला फक्त प्रतीक्षा करावी लागेल आणि जॉन्सनसाठी ते कसे घडते ते पहावे लागेल.

First published:
top videos

    Tags: Fitness, Social media, Viral, Viral news