नवी दिल्ली, 25 मे : आतापर्यंत तुम्ही बरेच टी-शर्ट पाहिले असतील. काही टी-शर्ट युनिक असतात म्हणजे ते खास तयार करवून घेतले जातात. असे टी-शर्ट तुम्हाला सेलिब्रिटी किंवा श्रीमंतांकडे पाहायला मिळतील. पण सध्या एक असं टी-शर्ट चर्चेत आलं आहे. जे सेलिब्रिटी आणि श्रीमंतांकडेही नाही. किंबहुना जगात हे एकमेव असं टी-शर्ट आहे आणि ते खूप खास आहे. या युनिक टी-शर्टचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये याची नोंद झाली आहे. युरोपियन देश रोमानियात तयार झालेलं हे टी-शर्ट. काही दिवसांपूर्वी ते रोमानियातील बुखारेस्ट शहरात प्रदर्शित करण्यात आलं होतं. हा अनोखा टी-शर्ट असोसिएशन 11 इलेव्हन, कॉफ्लँड रोमानिया आणि फेडरेटिया रोमाना यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. आपली निर्मिती देशाशी जोडण्यासाठी या लोकांनी राष्ट्रध्वजाचे मॉडेल म्हणून टी-शर्ट डिझाइन केलं. रोमानियाच्या रग्बी संघाकडूनही अशाच प्रकारचे टी-शर्ट वापरले जातात.
हे टी-शर्ट साधंसुधं नाही तर खूप खास आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले हे टी-शर्ट बनवण्यासाठी दोराच्या कापडाचा वापर करण्यात आला नाही तर चक्क प्लॅस्टिक बाटल्यांपासून हे टी-शर्ट तयार करण्यात आलं आहे. जगातील सर्वात महाग आईसक्रिम! किंमत वाचूनच घाम फुटेल; खाण्याचा तर तुम्ही विचारही करणार नाही प्लॅस्टिकच्या बाटल्यांची विल्हेवाट लावणं म्हणजे एक आव्हान, त्या नष्ट करता येत नाही. पण याच बाटल्यांपासून ही टी-शर्ट तयार करण्यात आलं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, 5 लाख प्लॅस्टिकच्या बाटल्या वितळवून हे टी-शर्ट तयार करण्यात आलं आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार 5 लाख बाटल्या गोळा करण्यासाठी 3 आठवडे लागले. तर हे टी-शर्ट शिवायला एक महिना लागला. याशिवाय या टी-शर्टची आणखी एक खासियत म्हणजे हे जगातील सर्वात मोठं टी-शर्ट आहे. आतापर्यंत तुम्ही स्मॉल, मीडियम, लार्ज, एक्स्ट्रा लार्ज असे टी-शर्ट पाहिले असतील. पण हे टी-शर्ट इतकं मोठं आहे, ही बाकी टी-शर्ट याच्यासमोर खूप म्हणजे खूपच लहान आहेत. याची लांबी 357.48 फूट आणि रुंदी 241.08 फूट आहे. ते इतकं लांब आहे की उघडून स्टेडिअमवर पसरवण्यासाठी 120 हून अधिक लोक लागले. या कामासाठी संपूर्ण दिवस गेला. जगात हा असा एकमेव डॉग, दुसरा शोधून सापडणारच नाही; काय आहे याच्यात खास पाहा हे टी-शर्ट बनवण्याचा उद्देशही खूप खास आहे. याद्वारे रोमानियातील लोकांना रिसायकल करण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे. त्यांच्यात जनजागृती करायची आहे. प्लॅस्टिकचा पुनर्वापर कसा करता येईल आणि त्याचा अधिक चांगला वापर कसा करता येईल हे त्यांना सांगायचं आहे.
The largest t-shirt is 108.96 m (357.48 feet) long and 73.48 m (241.08 feet) wide, achieved by Asociatia 11even, Kaufland Romania and Federatia Romana.
— Guinness World Records (@GWR) May 24, 2023
After the record attempt, the t-shirt was broken down into 10,000 individual items of clothing for underprivileged children. pic.twitter.com/lFVS9hIbPw
आता या एका टी-शर्टपासून 1200 सामान्य टी-शर्ट बनवले जाणार आणि ते गरजू मुलांमध्ये वितरित केले जाणार आहेत.