टोकियो, 06 मे : उन्हाळा म्हटलं की आईसक्रिम आलंचय लहान मुलंच नव्हे तर मोठ्यांनाही आईसक्रीम खायला आवडतं. अगदी 5 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत आईसक्रीम असतात. अशा महागड्या आईसक्रीम तुम्हीही खाल्ल्या असतील. पण जरा विचार करा फार फार तर एखाद्या आईसक्रीमची किंमत जास्तीत जास्त किती असेल? जगातील सर्वात महाग आईसक्रीम जिची किंमत इतकी आहे की वाचूनच घाम फुटेल. आईसक्रीमची किंमत वाचून तुम्ही ती खाण्याचा विचारही करणार नाही.
जगातील सर्वात महागडी आईसक्रीम म्हणून नुकताच एका आईसक्रीमचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड्समध्ये सर्वात महाग आईसक्रीमची नोंद झाली आहे. ही आईसक्रीम कित्येक श्रीमंतांनाही खाणं परवडणार नाही. ही आईसक्रीम खाण्यासाठी काही जणांना तर कर्जच घ्यावं लागेल. बायकुया असं या आईसक्रीमचं नाव आहे. जपानची आईस्क्रीम बकंपनी सिलाटोचं हे आईसक्रीम.
ओ तेरी! आता चक्क सोन्याचा चहा; कसा बनवला GOLD TEA एकदा पाहाच
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, 25 एप्रिल रोजी जगातील सर्वात महागडे आइस्क्रीम बनण्याचा नवा विक्रम झाला आहे.
हे एक प्रोटीन रिच आइस्क्रीम आहे. याचा बेस दूध, दोन प्रकारचे चीज, अंड्यातील पिवळ बलक इत्यादीपासून बनलेला आहे. याशिवाय परमिगियानो चीज, व्हाईट ट्रफल, ट्रफल ऑइल अशा अनेक गोष्टी या आइसक्रीममध्ये येतात. हे आइसक्रीम स्टायलिश ब्लॅक बॉक्समध्ये येतं. यासोबत एक धातूचा चमचाही मिळतो. जो क्योटोमधील क्राफ्ट्समॅननी तयार केला आहे. मंदिरे बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या तंत्राचा वापर करून हा धातूचा चमचा तयार करण्यात आला आहे.
बस्सं फक्त बर्गरचं नाव सांगा आणि मिळवा 2 लाख रुपये; एका झटक्यात लखपती होण्याची सुवर्णसंधी
आइस्क्रीम कंपनीच्या वेबसाइटवर याची किंमत 6700 डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. आइसक्रीमसोबत मिळणाऱ्या चमचा बाजूला ठेवला तरी या आईसक्रीमची किंमत सर्वात जास्तच आहे. गिनीज बुकनेही चमच्याशिवायच या आईसक्रीमची महागडी आईसक्रीम म्हणून नोंद केली आहे.
कंपनीच्या मते, पांढर्या वाइनसोबत खाल्ल्यास या आईसक्रीमची चव चांगली लागते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Record, Viral, World record