मुंबई : आजकाल बऱ्याच गोष्टी मेसेज मार्फत होऊ लागल्या आहेत. बऱ्याचवेळा जेव्हा आपण काही कारणास्तव कोणाचाही फोन उचलू शकत नाही तेव्हा आपण मेसेजवर सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. सध्या आपण हे काम मेसेजिंग ऍपद्वारे करते. व्हॉट्सऍप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ऍप आहे. पण जेव्हा हे ऍप नव्हते किंवा फोन हे स्मार्ट नव्हते, तेव्हा मेसेज पाठवण्यासाठी SMS चा एकमेव पर्याय होता. सुरुवातीच्या काळात यासाठी पैसे द्यावे लागायचे. पण आता SMS चा वापर देखील कमी झाला आहे, तसेच ते कंपनीने आता फ्री देखील केलं आहे. बांगलादेशात रेल्वेचे तीन ट्रॅक का असतात? यामागचे कारण जाणून वाटेल आश्चर्य पण तुम्ही कधी विचार केलाय का की जेव्हा SMS चा वापर सुरु झाला तेव्हा जगातील पहिला टेक्स्ट मेसेज कोणता होता? किंवा त्या SMS मध्ये काय लिहिलं असेल? हे जाणून घेणं खरंतर फारच मनोरंजक असेल. 31 वर्षांपूर्वी 3 डिसेंबर 1992 रोजी जगातील पहिला SMS लिहिला गेला होता. हा SMS फारच साधा आणि मजेदार होता. त्यात लिहिलं होतं ‘मेरी ख्रिसमस’. 15-अक्षरांचा हा मेसेज नील पापवर्थ यांनी व्होडाफोनच्या नेटवर्कद्वारे लिहिला होता आणि व्होडाफोनचे कर्मचारी रिचर्ड जार्विस यांना ख्रिसमस पार्टीच्या वेळी तो रिसिव्ह झाला होता. त्या वेळी, 22 वर्षीय ब्रिटीश प्रोग्रामर नील पापवर्थ यांनी संगणकावरून पहिली लघु संदेश सेवा (SMS) केला आणि त्यानंतर आधुनिक संदेशवहन सुरू झाले. डेलीमेलच्या मते, 2017 मध्ये नील पापवर्थ म्हणाले, ‘1992 मध्ये, मला कल्पना नव्हती की मजकूर पाठवणे इतके लोकप्रिय होईल, आणि यामुळे लाखो लोक वापरत असलेल्या इमोजी आणि मेसेजिंग अॅप्सना जन्म देईल.’
जगातील पहिला SMS NFT म्हणून विकला गेला ब्रिटिश टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने गेल्या वर्षी SMSचा NFT म्हणून लिलाव केला होता. ऐतिहासिक मजकूर NFT म्हणून पुन्हा तयार केला गेला, जो डिजिटल पावती आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, पॅरिसमधील अगुटच्या लिलावगृहाने प्रतिष्ठित मजकूर संदेशाचा लिलाव केला होता. या संदेशाचा खरेदीदार हा मजकूर संदेशाच्या मूळ संप्रेषण प्रोटोकॉलच्या तपशीलवार आणि अद्वितीय प्रतिकृतीच्या वास्तविक मालकीचा एकमेव मालक आहे. खरेदीदाराने इथर क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे दिले होते.