जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! स्टेशन सोडून हवेत निघाली मेट्रो, अपघात होणार तेवढ्यात समोर आला व्हेल मासा आणि..

बापरे! स्टेशन सोडून हवेत निघाली मेट्रो, अपघात होणार तेवढ्यात समोर आला व्हेल मासा आणि..

बापरे! स्टेशन सोडून हवेत निघाली मेट्रो, अपघात होणार तेवढ्यात समोर आला व्हेल मासा आणि..

रॉटरडॅम शहरात एक मेट्रो अतिशय आउट ऑफ कंट्रोल झाली होती. डी. एकेर्स नावाच्या एका स्टेशनला तोडत, ही मेट्रो हवेत उडाली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नेदरलँड्स, 2 नोव्हेंबर : नेदरलँड्समध्ये एक भयानक अपघात होता होता टळला आहे. शहरात एक मेट्रो ट्रेन अतिशय स्पीडमध्ये स्टेशनचा मार्ग सोडून हवेत उडण्याच्यावेळी एक ‘व्हेल माशाच्या शेपटी’ने या ट्रेनला रोखलं, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. नेदरलँड्सच्या रॉटरडॅम शहरात एक मेट्रो अतिशय आउट ऑफ कंट्रोल झाली होती. डी. एकेर्स नावाच्या एका स्टेशनला तोडत, ही मेट्रो हवेत उडाली होती. परंतु सुदैवाने तेथेच एका व्हेल माशाच्या शेपटीचा पुतळा होता. त्या शेपटीने अतिशय अद्भुतपणे या मेट्रोचा पहिला डब्बा रोखला आणि मेट्रो ट्रेन तेथेच अडकली. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, व्हेल माशाच्या शेपटीचा आर्ट पीस, मेट्रोजवळ एका पार्कमध्ये 20 वर्षांपूर्वी बनवण्यात आला होता. या आर्ट पीसमध्ये दोन मोठ्या व्हेल माशाच्या महाकाय शेपटी तयार करण्यात आल्या आहेत. त्या शेपटीमुळेच मेट्रो अडकली आणि मोठा अपघात टळला.

(वाचा -  PHOTOS: तुर्कस्तानातील भूकंपात आतापर्यंत 58 लोकांचा मृत्यू, 900हून अधिक जखमी )

या मेट्रोच्या ड्रायव्हरचा जीव थोडक्यात बचावला आहे. या अपघातामुळे ड्रायव्हरला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. या मेट्रोमध्ये ड्रायव्हर एकटाच होता, त्याच्याशिवाय इतर कोणताही प्रवासी त्यात नव्हता. भल्यामोठ्या व्हेल माशाच्या शेपटीच्या आर्ट पीसमुळे मोठी दुर्घटना टळली.

(वाचा -  धक्कादायक! गणेशाच्या मूर्तीची विटंबना; पाकिस्तानात प्राचीन हिंदू मंदिराची तोडफोड )

पोलिसांनी ट्विट करत, या घटनेनंतर काही प्रमाणात नुकसान झाल्याचं म्हटलंय. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगितलं आहे. मेट्रो ट्रेन इतकी आउट ऑफ कंट्रोल कशी झाली, याचीदेखील चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात