Home /News /viral /

'कृपया लक्ष द्या...'; लग्नाआधी सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत नवरीबाईने दिली Warning

'कृपया लक्ष द्या...'; लग्नाआधी सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत नवरीबाईने दिली Warning

लग्नादिवशी नवरीबाईने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. जो तुफान व्हायरल होतो आहे.

  मुंबई, 28 जानेवारी : लग्नाचे बरेच  (Wedding Video) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असे खूप व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील ज्यात नवरा-नवरी काहीतरी हटके करताना दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर अशा नवरीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जिने असं काही भन्नाट करून दाखवलं आहे की तुम्ही विचारही केला नसेल. व्हिडीओत पाहू शकता लाल रंगाचा लहंगा, दागिने घालून लग्नासाठी तयार झाली आहे. कॅमेऱ्यासमोर ती उभी राहिली आहे. आता नवरी म्हटली की कॅमेऱ्यासमोर ती आपले थोडे नखरे दाखवेल, लाजेल-मुरडेल. पण नाही या नवरीबाईने यापैकी काहीच केलं नाही. उलट तिने व़ॉर्निंग दिली आहे. लग्नाच्या दिवशी लग्न होण्याआधी तिने एक खास घोषणा केली. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. पण तिची घोषणा ऐकून तिचं कौतुकही केलं जातं. असं नेमकं ही नवरी काय म्हणाली पाहुया. हे वाचा - VIDEO - 3 चोरांची झाली फजिती! इतकी धडपड केली तरी तिघं मिळून पळवू शकले नाहीत एक टीव्ही तुम्ही व्हिडीओ ऐकाल तर ही नवरी म्हणते, कृपया लक्ष द्या. सीटवरील बेल्ट अशा पद्धतीने बांधलं जातं. हा पट्टा अशा पद्धतीने खेचा. बेल्ट खोलण्यासाठी फ्लॅप अशा पद्धतीने उचला. या विमानात 8 आपात्कालीन दरवाजे आहेत. दोन पुढे, दोन मागे आणि चार पंखांच्या वर.
  या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही नवरी एअर हॉस्टेस म्हणजे हवाई सुंदरी आहे.  परिधी शर्मा दुबे (Air Hostess Paridhi Sharma Dubey)  असं या नवरीचं नाव आहे. हे वाचा - VIDEO: नवरी-नवरदेवाच्या मांडीवर कोसळला युवक; भडकलेल्या नवरदेवाने काय केलं पाहा परिधी आपल्या लग्नादिवशीही ड्युटीच्या मूडमध्ये दिसते आहे. लग्नाच्या ड्रेसमध्ये प्री-फाइट सेफ्टी ब्रीफिंग  (Pre-fight Safety Briefing) देताना दिसते आहे. एअर हॉस्टेलस नवरीबाईने ज्या प्रेमाने, ज्या अंदाजात सूचना दिल्या आहेत, त्या सर्वांनाच आवडल्या आहेत  (In-flight Safety Demonstrations). सोशल मीडियावर नेटिझन्स तिचं कौतुक करत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या