जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पळून पळून किती पळणार! डॉक्टरांनी अशा ठिकाणी दिली कोरोना लस ज्याचा कुणी विचारही केला नसेल

पळून पळून किती पळणार! डॉक्टरांनी अशा ठिकाणी दिली कोरोना लस ज्याचा कुणी विचारही केला नसेल

पळून पळून किती पळणार! डॉक्टरांनी अशा ठिकाणी दिली कोरोना लस ज्याचा कुणी विचारही केला नसेल

लशीपासून दूर पळणाऱ्या त्या व्यक्तीला अखेर डॉक्टरांनी लस दिलीच.

  • -MIN READ
  • Last Updated :

अर्जेंटिना, 14 जुलै : कोरोनाचा अधिक वाढता धोका लक्षात घेता कोरोना लसीकरणाला वेग दिला जात आहे. पण काही लोक अद्यापही कोरोना लस (Corona vaccine) घेण्यास तयार नाहीत. कोरोना लशीची (Corona vaccination) सुरक्षितता आणि प्रभावावर प्रश्नचिन्हं म्हणा किंवा लशीची भीती (Corona vaccine fear) म्हणा, काही लोक लसीकरणासाठी तयार होत नाही आहेत. असाच लसीकरणासाठी नकार देणाऱ्या एका व्यक्तीचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Social media viral video) होतो आहे. ज्याला जबरदस्तीने लस देण्यात आली आहे. कोरोना लसीकरणाबाबत तसे बरेच व्हिडीओ (Corona vaccination video) समोर आले. कोण लस घेताना घाबरतं आहे, कुणी ड्रामा करतं आहे. अशाच व्हिडीओच्या यादीत आता हा एक व्हिडीओ. ज्यात एका व्यक्तीने आपल्याला लस देऊ नये म्हणून चक्क पळ काढला. पण डॉक्टरांनी त्याला अखेर लस दिली तीसुद्धा अशा ठिकाणी ज्याची कुणीच कल्पनाही केली नसेल (Argentina corona vaccination on roof).

जाहिरात

आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. Forcible vaccination अशा हॅशटॅगसह हा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. हे वाचा -  कोरोना लस घेत नव्हती म्हणून दोन्ही हातपाय धरले आणि…; महिलेसोबत पुढे काय घडलं VIDEO मध्येच पाहा व्हिडीओत पाहू शकता. एका घराच्या छतावर काही लोक आहे. चार-पाच जणांनी एका व्यक्तीला पकडलं आहे. ती व्यक्ती पळण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्या व्यक्तीला पळता काही येत नाही आहे. कारण सर्वांनी त्याला अगदी घट्ट धरून ठेवलं आहे. या व्यक्तीला लस देण्याचा प्रयत्न होतो आहे. ही व्यक्ती लशीपासून पळ काढत होती. डॉक्टर्स जेव्हा कोरोना लस देत होते, तेव्हा या व्यक्तीने धूम ठोकली आणि छतावर गेली. तेव्हा सुरक्षारक्षक आणि डॉक्टर्सही छतावर पोहोचले आणि तिथं तर तिथं पण याला कोरोना लस द्यायची असंच त्यांनी ठरवलं. या व्यक्तीला जबरदस्ती लस देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यावेळी तिथं असलेल्या प्रत्यक्षदर्शीने हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हे वाचा -  COVID-19 Vaccine: लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे अधिक दुष्परिणाम का होतात? हा व्हिडीओ अर्जेंटिनातील असल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना काय काय करावं, लागतं याची कल्पना तुम्हाला हा व्हिडीओ पाहून येईलच. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने आणि आपण एक आहोत, जे मास्क सक्तीचं केल्यानंतर पोलिसांचा सोशल मीडियावर बँड वाजवतो, असं म्हटलं. तर एकाने भारतातही असंच व्हायला हवं अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात