मुंबई, 10 फेब्रुवारी : सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळातात. शिवाय येथे अपघाताशी संदर्भात देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ थरारक असतात. असाच एका अपघाताचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा अपघात तसा भयानक होता, ज्यामध्ये कोणाचाही जीव जाऊ शकला असता किंवा कोणाही गंभीर जखमी देखील होऊ शकलं असतं. पण नशिबाने असं काही झालेलं नाही. पण ज्या पद्धतीने अपघात होतो. ते पाहून तुम्ही म्हणाल, ‘काय नशिब आहे याचं.’ सेल्फीच्या मोहाने तरुणाला अडचणीत टाकलं, रागावलेल्या हत्तीने थेट उचलून आपटलं आणि मग… हा कार अपघाताचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक महिला आपली कार थेट एका जिममध्ये घुमवते. तेथेच एक व्यक्ती ट्रेडमिलवरती कार्डिओ एक्सरसाइज करत असते. त्या व्यक्तीला या मशिनसह कार धडकते. ही व्यक्ती त्या मशिनवरुन खाली पडते. पण नशिबाने त्याला काही झालेलं नाही. वास्तविक, एका यूजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआउट करताना दिसत आहे. तो ट्रेडमिलवर धावत आहे. दरम्यान, अचानक समोरील काचेचा दरवाजा तोडून कार आतमध्ये घुसली. त्याला काही समजण्याआधीच कार ट्रेडमिलला जोरात धडकली आणि ही व्यक्ती पडली. त्यानंतर कारचा दरवाजा उघडून एक महिला बाहेर येते. ट्रेंडमिवरुन पडलेल्या व्यक्तीचे एक्सप्रेशन पाहाण्यासारखे आहे.
Can you imagine just being on the treadmill and this happens? 💀 pic.twitter.com/sRbIlVSRJE
— chris evans (@notcapnamerica) February 6, 2023
एका मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना काही काळापूर्वी घडली होती, जी आता व्हायरल होत आहे. ही घटना अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील असल्याचं देखील सांगितलं जात आहे.
या जखमी व्यक्तीचे नाव सॅम्युअल असे असल्याचेही सांगण्यात आले आहे. फॉक्स न्यूजसोबतच्या भयानक अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणाला होता की मी वाचलो हा एक चमत्कार होता.