जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं, उचलून त्याला असा आदळला की थेट...

हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं, उचलून त्याला असा आदळला की थेट...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तसे पाहाता हत्ती हे सगळ्यात शांत प्राण्यांमध्ये येतात. पण ते जेव्हा रागावतात तेव्हा मात्र त्यांना आवरणं कठीण होऊन बसतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी : आपल्याकडे काही हौसी मंडळी असतात, ज्यांना इतरांपैक्षा वेगळं करायला किंवा काही धाडसी काम करायला आवडतं. त्यामुळे ते संधी मिळेत तिकडे आपलं धाडस दाखवण्यासाठी तयार असतात. मग त्यांपैकी काही लोक याचे व्हिडीओ करतात किंवा फोटो काढतात, जे सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या मित्रांना दाखवतात आणि त्यांच्यामध्ये चर्चेत राहातात. असंच काहीसं करण्याचा प्रयत्न एका तरुणाने करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची त्याला भयानक शिक्षा मिळाली. तसे पाहाता हत्ती हे सगळ्यात शांत प्राण्यांमध्ये येतात. पण ते जेव्हा रागावतात तेव्हा मात्र त्यांना आवरणं कठीण होऊन बसतं. अशावेळी जंगलाचा राजा सुद्धा त्याच्यासमोर तग धरु शकत नाही, ज्यामुळे शिकारी प्राणी देखील कधी हत्तीच्या वाट्याला जात नाही. हे ही पाहा : शरीर संबंधासाठी नववधूचा नकार, कारण समोर येताच सरकली नवरदेवाच्या पाया खालची जमीन पण मज्जा म्हणून आणि एक धाडस म्हणून एक तरुणी हत्तीजवळ सेल्फी घेण्यासाठी गेला आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकून बसला. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील ही घटना आहे. येथे एक तरुण जंगली हत्तींच्या कळपासोबत सेल्फी घेण्यासाठी गेला. तेव्हा संतापलेल्या हत्तीने तरुणावर हल्ला केला, त्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना जिल्ह्यातील काटघोरा वनविभागातील रेकी गावातील आहे.

जखमी संतोष

हत्तींचा कळप गावाजवळ आल्याचे कळताच तेथील रहिवासी हत्तीला पाहण्यासाठी गर्दी करु लागले. तेव्हा बुधवारी सकाळी रामपूर येथील रहिवासी संतोष पोरते हा रेकी जंगलात हत्ती पाहण्यासाठी गेला. तेव्हा मोबाईलवरून तो सेल्फी घेत होता. इतक्यात एक हत्ती रागावला आणि त्याच्याकडे धावला. त्याला काही समजण्याआधीच हत्तीने त्याला उचलून फेकून दिलं.

News18लोकमत
News18लोकमत

हत्तीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या संतोष या तरुणाने कसेबसे पळून आपला जीव वाचवला. त्याला हरडीबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. हत्तींसोबत सेल्फी घेण्याच्याही अशाच घटना यापूर्वी घडल्या आहेत. लोकांना आवाहन करताना वनविभागाच्या पथकाने हत्तींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात