मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'मम्मी... उतार दो...', लहान मुलांसारखी रडू लागली महिला; Paragliding चा हा नवा मजेशीर VIDEO तुम्ही पाहिलात का?

'मम्मी... उतार दो...', लहान मुलांसारखी रडू लागली महिला; Paragliding चा हा नवा मजेशीर VIDEO तुम्ही पाहिलात का?

पॅराग्लायडिंग करणाऱ्या त्या तरुणानंतर आता एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

पॅराग्लायडिंग करणाऱ्या त्या तरुणानंतर आता एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

पॅराग्लायडिंग करणाऱ्या त्या तरुणानंतर आता एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 07 डिसेंबर : पॅराग्लायडिंगचा 'बस्सं लँड करा दे' व्हिडीओ तुम्ही अजूनही विसरला नसाल (Paragliding funny video). यानंतर असाच पॅराग्लायडिंगचा आणखी एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Paragliding video viral) झाला आहे. एक महिला पॅराग्लायडिंग दरम्यान मोठमोठ्याने ओरडताना दिसली (Woman screaming paragliding). 'मम्मी... उतार दो' म्हणत अक्षरशः लहान मुलांसारखी रडताना दिसली.

बहुतेकांना उंचीची भीती वाटते. पण तरी पॅराग्लायडिंग करण्याचा मोहही आवरत नाही. पण उत्सुकतेपोटी जेव्हा ते पॅराग्लायडिंग करतात आणि आकाशात झेपावतात तेव्हा त्यांची हवा टाईट होते. अशीच अवस्था झाली आहे. मम्मी... उतार दो, भैय्या प्लीज मुझे उतार दो, अशी विनंती ती गाईडला करू लागली.

हा व्हिडीओसुद्धा हिमाचल प्रदेशचाच आहे. NewsHimachal24 च्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  व्हिडीओत पाहू शकता जसं पॅराग्लायडिंग सुरू होतं. तशीच ही महिला ओरडू लागते. तिच्या सोबत असलेला साथीदार तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो. पण महिला काही त्याचं ऐकत नाही. ती फक्त मला उतरवा असाच तगादा लावते. संपूर्ण पॅराग्लायडिंग दरम्यान ती आपले डोळे घट्ट मिटून घेते आणि ओरडताना, रडताना दिसते.

हे वाचा - चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी धडपड; बचावाचा थरारक Video viral

याआधी हिमाचल प्रदेशच्या मनालीत उत्तर प्रदेशच्या बांदातील विपीन कुमार साहू पॅराग्लायडिंग करायला गेला होता. त्याचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. हा तरुण खूपच फेमस झाला होता. त्यानंतर पॅराग्लायडिंगचे असे आणखी दोन व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यापैकी एक व्हिडीओ हा पवन नावाच्या तरुणाचा होता. 7 मिनिटे 29 सेंकदाचा हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील आहे.

" isDesktop="true" id="640352" >

व्हिडिओमध्ये पवन वारंवार पॅराग्लायडिंग ट्रेनरला खाली उतरवण्यास सांगत आहे. ट्रेनर पवनला शांत करण्याचा प्रयत्न करतोय पण घाबरलेला पवन काही केल्या ऐकण्यास तयार नाही. घाबरलेला पवन एका क्षणी चक्क हवा कमी करण्यास सांगतो. यावर ट्रेनर आता मी हवा कशी काय कमी करू असा प्रश्न विचारतो. पॅराग्लायडिंग करत असताना पवन ट्रेनरशी जो संवाद करतो तो ऐकल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल.

हे वाचा - VIDEO - स्टाईल कसली साधं तोंडही दाखवू शकत नाही; जीममध्ये तरुणीसमोर तरुणाची फजिती

काही महिन्यांपूर्वी एका महिलेचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. मम्मी, भैय्या जल्दी उतार दो, अशी मी महिला ओरडत होती.  गाईड तिला दीर्घ श्वास घ्यायला सांगतो. पण तरी ती ऐकत नाही.  माझे हातपाय कापत आहेत. हवं तर तुला एक हजार रुपये देते पण लवकर ही राइड संपव. मी डोळे उघडू शकत नाही. असं केलं तर मी खाली पडेन, असंही ती त्याला सांगते.

First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos