मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - आता स्टाईल कसली साधं तोंडही दाखवू शकत नाही; GYM मध्ये तरुणीसमोर तरुणाची झाली फजिती

VIDEO - आता स्टाईल कसली साधं तोंडही दाखवू शकत नाही; GYM मध्ये तरुणीसमोर तरुणाची झाली फजिती

स्टाइल मारणं तरुणाला चांगलंच महागात पडलं.

स्टाइल मारणं तरुणाला चांगलंच महागात पडलं.

स्टाइल मारणं तरुणाला चांगलंच महागात पडलं.

मुंबई, 07 डिसेंबर : एखादी तरुणी समोर दिसली रे दिसली की काही तरुण तिला इम्प्रेस (Impressing girl) करण्याची एक संधी सोडत नाहीत. काहीतरी स्टाईल (Boy style video) मारून तिचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. तरुणीला स्टाईल दाखवण्याच्या नादात या तरुणाने असं काही केलं की यापुढे स्टाईल कसली तो या तरुणीला आता आपलं तोंडही दाखवू शकणार नाही (Boy style video in gym).

एका जीममधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. एक तरुणी ट्रेडमिलवर दिसते आहेत. तिच्या मागून एक तरुण येतो. तिला हात लावून आता आपल्याकडे बघ असं सांगतो. ती तरुणीही त्याच्याकडे पाहत राहते. तरुण तिला आपलं करतब दाखवायला जातो. पण भलतंच घडतं. तरुणाची तरुणीसमोर चांगलीत फजिती होते.

View this post on Instagram

A post shared by #NewNormal (@ngakaksehat)

व्हिडीओत पाहू शकता तरुण तरुणीशेजारी असलेल्या चालत्या ट्रेडमिलवर चढण्याचा प्रयत्न करतो. जसा तो चढतो तसा तो तोंडावर धाडकन आपटतो. तरुणीसमोरच तो आडवा होतो. आता स्टाईलच्या नादात त्याची फजिती झाली हे त्यालाही समजलं. पण तरी तरुणीसमोर आपला रूबाब कायम ठेवण्यासाठी तो जमिनीवर पडताच पुशअप्स मारू लागतो आणि नंतर कसाबसा उठून तिथून गप्पपणे निघून जातो. त्याला स्वतःला सावरताही येत नसतं.

हे वाचा - एअरपोर्टवर महिलेनं केलं असं कृत्य की वळून वळून पाहू लागले लोक, झाली अटक

ngakaksehat इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सना हसू आवरलं नाही. हा तरुण पुढे स्टाईल मारताना शंभर वेळा विचार करेल, अशा मजेशीर कमेंट येत आहेत. तर काही जणांनी दिखाव्याच्या नादात आपण पडू नये, जीममध्ये स्टाइल दाखवणं खतरनाक ठरू शकतं, असं म्हणत इतरांना सावधही केलं आहे.

याआधी एका मुलाने मुलींसमोर अशीच स्टाईल मारण्याच्या नादात छतावरून उडी मारली होती आणि आपले हातपाय तोडून घेतले होते. @_____solemon_____• या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडीओत पाहू शकता. एक मुलगा आपल्या काही मित्र-मैत्रिणींसोबत घराच्या छतावर बसला होता. काही वेळात तो धावत छताच्या कोपऱ्यावर येतो आणि कोलांटी घेत छतावरून खाली उडी मारतो. हवेत तो गोलगोल फिरतो आणि धाडकन जमिनीवर आपटतो. त्याचा स्टंट त्याला चांगलाचा भारी पडला.

हे वाचा - NETFLIX वरून दोन बहिणींमध्ये कडाक्याची भांडणं, कारण ऐकून कळेना हसावं की रडावं

या स्टंटच्याच व्हिडीओत तुम्ही पुढे पाहू शकता की तो थेट रुग्णालयात दिसतो.  त्याच्या हाताला दुखापत झाली आहे, हात फ्रॅक्चर झाला आहे. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही आहे.  हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही युझर्स तरुणाची अवस्था पाहून हैराण झाले आहेत. त्यांनी तरुणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर काहींना तरुणींसमोर स्टंट मारणाऱ्या या तरुणाची खिल्ली उडवत मजेशीर कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: Funny video, Stunt video, Viral, Viral videos