Home /News /viral /

रातोरात बदललं नशीब; महिलेला मोफत मिळालं लॉटरी तिकीट; पुढे जे घडलं ते जाणून व्हाल थक्क

रातोरात बदललं नशीब; महिलेला मोफत मिळालं लॉटरी तिकीट; पुढे जे घडलं ते जाणून व्हाल थक्क

या महिलेनं सांगितलं, की ती आणि तिची आई दर शुक्रवारी लॉटरीचं तिकीट खरेदी करतात. दरवेळीप्रमाणे यावेळीदेखील शुक्रवारी ती लॉटरीचं तिकीट विकत घेण्यासाठी गेली.

    नवी दिल्ली 24 सप्टेंबर : आजच्या काळात पैसे कोणाला प्रिय नाहीत? तेही काहीही कष्ट न करता पैसे मिळाले तर बातच और. कमी वेळात जास्त पैसे मिळवण्यासाठी लोक अनेकदा लॉटरीचं तिकीट (Lottery Ticket) विकत घेताना दिसतात. मात्र, यातील काहीच लोक असे असतात ज्यांना लॉटरी लागते आणि ते रातोरात श्रीमंत होतात. असंच काहीसं घडलं ऑस्ट्रेलियात (Australia) राहणाऱ्या एका महिलेसोबत. धक्कादायक! ..अन् रागात गर्लफ्रेंडनं फेकून मारला मोबाईल; तरुणाचा मृत्यू upi.com नं दिलेल्या वृत्तानुसार, फ्रीमध्ये मिळालेल्या लॉटरी तिकीटानं (Free Lottery Ticket) महिलेला घरबसल्या श्रीमंत बनवलं. न्यूज वेबसाईटला दिलेल्या एका मुलाखतीत या महिलेनं सांगितलं, की ती आणि तिची आई दर शुक्रवारी लॉटरीचं तिकीट खरेदी करतात. दरवेळीप्रमाणे यावेळीदेखील शुक्रवारी ती साउथ ऑस्ट्रेलियाच्या द क्लेयर फार्मसी (Clare Pharmacy) येथे लॉटरीचं तिकीट विकत घेण्यासाठी गेली. मात्र, यावेळी तिनं स्वतःसाठी लॉटरीचं तिकीट विकत घेतलं नाही. तिनं केवळ आपल्या आईसाठी तिकीट विकत घेतलं आणि ती परतू लागली. इतक्यात दुकानदारानं तिला बोनस तिकीट दिलं, जे अगदी मोफत होतं. कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी मुलानं केलं हे भलं काम; VIDEO पाहून पाणावतील डोळे या फ्री तिकीटानं महिलेचं नशीबच पालटलं. तिनं यातून 72,300.50 डॉलर म्हणजेच तब्बल 53,35,631 रुपये जिंकले. महिलेनं म्हटलं की या लॉटरी तिकीटानं आमचे दिवसच बदलले. हे पैसे ती आपले पालक, मुलगी आणि स्वतःसाठी खर्च करणार आहे. महिलेच्या घरची आर्थिक परिस्थिती ठीक नाही. त्यामुळे कधीतरी आपलं नशीब चमकेल या आशेनं ही महिला आणि तिची आई दर आठवड्याला लॉटरीचं तिकीट खरेदी करायची.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Lottery, Viral news

    पुढील बातम्या