जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दुचाकीच्या धडकेत महिला ठार, भीषण अपघाताचा Video आला समोर

दुचाकीच्या धडकेत महिला ठार, भीषण अपघाताचा Video आला समोर

अपघाताची धक्कादायक घटना

अपघाताची धक्कादायक घटना

अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रोज एक अपघाताची बातमी समोर येत असते. रस्त्यांवर भरधाव चालणाऱ्या गाड्यांमुळे अनेक भीषण अपघात घडत असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 27 एप्रिल : अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रोज एक अपघाताची बातमी समोर येत असते. रस्त्यांवर भरधाव चालणाऱ्या गाड्यांमुळे अनेक भीषण अपघात घडत असतात. या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर समोर येतात. अशातच आणखी एका भयान अपघाताची घटना समोर आलीये. जेवण झाल्यानंतर रात्री शतपावली करण्यासाठी निघालेल्या एका महिलेला दुचाकी स्वराने धडक दिली. या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. रात्रीच्या वेळीचा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

जेवण झाल्यानंतर रात्री शतपावली करण्यासाठी निघालेल्या एका महिलेला दुचाकी स्वराने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून यात पादचारी महिलेस दुचाकी स्वाराने जोरदार धडक दिल्याचे स्पष्ट दिसते. जेल रोडच्या पाण्याच्या टाकी कडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मोटरसायकल चालकाने महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेने तिच्या डोक्याला व छातीला जोरदार मार लागला आणि महिलेला उपचारासाठी नाशिक रोड येथील रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.

जाहिरात

दरम्यान, रस्त्यांवरील असे अपघात वाढत चालले आहेत. कधी कधी चुकी नसलेल्या लोकांचाही या अपघातात जीव जातो. त्यामुळे रस्त्यांवरुन चालताना नेहमीच खबरदारी घेण्याची आवश्यकता असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात