जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला केलं लग्नासाठी प्रपोज, पण नको ते घडलं, VIDEO

रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला केलं लग्नासाठी प्रपोज, पण नको ते घडलं, VIDEO

रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला केलं लग्नासाठी प्रपोज, पण नको ते घडलं, VIDEO

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गर्दीत महिलेला प्रपोज करताना दिसत आहे. परंतु असं जाणवतं की महिलेला त्याच्या प्रपोजलमध्ये अजिबात रस नाही (Woman Turned down Boyfriend’s Marriage Proposal) .

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 मे : नात्यात प्रेम व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. कारण ते व्यक्त केल्याशिवाय कोणीही आपल्या मनातील गोष्टी जोडीदाराला सांगू शकत नाही. पण कधी आणि कुठे व्यक्त व्हायचं हेही लोकांना नीट कळायला हवं, कारण अशा प्रसंगी अपमान होण्याची शक्यताही भरपूर असते. नुकतंच दक्षिण आफ्रिकेतील एका फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये असंच काही घडलं, जिथे एका व्यक्तीने प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज केलं (Man propose girlfriend in McDonald’s), मात्र पुढे भलतंच घडलं. VIDEO : वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान कोसळलं लग्नाचं स्टेज; खाली पडणाऱ्या नवरीला वाचवण्यासाठी धावला नवरदेव अन्.. द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये एक घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गर्दीत महिलेला प्रपोज करताना दिसत आहे. परंतु असं जाणवतं की महिलेला त्याच्या प्रपोजलमध्ये अजिबात रस नाही (Woman Turned down Boyfriend’s Marriage Proposal).

जाहिरात

सँडटन सिटी मॉलमधील मॅकडोनाल्डमध्ये ही घटना घडली. रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देणाऱ्यांची मोठी रांग लागली होती. त्याच रांगेत एक महिला उभी होती आणि तिच्या मागे एक व्यक्ती होता. रांगेत उभा असतानाच अगदी गर्दीच्या ठिकाणी हा व्यक्ती आपल्या गुडघ्यावर बसला आणि समोर उभा असलेल्या महिलेला अंगठी देऊ लागला. हे पाहून महिलेला धक्काच बसला आणि त्या व्यक्तीवर रागवायला सुरुवात केली. हा व्यक्ती जवळपास 3 मिनिटं तिथे बसून राहिला पण ती महिला चिडतच राहिली. दरम्यान, लोकांनी तिला हा प्रस्ताव स्वीकारण्यास प्रवृत्त केलं, मात्र ती रागाच्या भरात निघून गेली आणि सगळे या व्यक्ती हसू लागले डॉक्टर बॉयफ्रेंडला घरी घेऊन गेली तरुणी; कुटुंबीयांसमोरच त्याने केलेली मागणी ऐकून झाली शॉक 28 एप्रिल रोजी @Madame_Fossette नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला 35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही लोकांनी तीच घटना वेगळ्या अँगलने रेकॉर्ड केली आहे आणि त्याचा व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट केला आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये असं दिसतं की जेव्हा हा व्यक्ती तिला प्रपोज करतो तेव्हा मागे उभा असलेले सर्वजण दूर जातात आणि महिला एकटीच त्या ओळीत उभा दिसते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात