वॉशिंग्टन, 12 जुलै: विमान (Plane) प्रवास करताना नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. विमान (Flight) आकाशात असताना विमानाच्या खिडक्या, दरवाजा उघडू नये, असा सल्ला दिला जातो. पण काही प्रवासी असं काही विचित्र करतात की त्यामुळे इतर प्रवाशांचाही जीवही धोक्यात टाकतात. असा प्रयत्न एका महिला प्रवासाने केला. या महिलेनं चक्क विमान आकाशात उडत असतानाच विमानाचा दरवाजा उघडण्याचाप्रयत्न केला (Woman trying to open plane door). अमेरिकन एअरलाइन्सच्या एका फ्लाइटमधील ही धक्कादायक घटना. हे विमान टेक्सासहून नॉर्थ कॅलिफोर्नियाला जात होतं. विमान हवेतच होतं, तेव्हा एक महिला प्रवासी विमानाच्या दरवाजाजवळ गेली आणि तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर क्रू मेंबर्सनी महिलेवर अॅक्शन घेतली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
American Airlines passenger duct-taped to seat after trying to open aircraft door midflight. Video by lol.ariee https://t.co/4Awon2l0cz pic.twitter.com/wAMM8FDE0a
— Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) July 11, 2021
ब्रेकिंग एव्हिएशन न्यूज अँड व्हिडीओ या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या महिला प्रवाशाने उड्डाणावेळी विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला डक टेपने सीटला बांधण्यात आलं, अशी माहिती या व्हिडीओसोबत पोस्टमध्ये देण्यात आली आहे. फ्लाइट लँड होईपर्यंत महिलेला असंच बांधून ठेवण्यात आलं होतं. हे वाचा - VIDEO: डिलिव्हरी बॉयला रस्त्यातच अटक; पोलिसानं महिलेच्या घरी पोहोचवली ऑर्डर या व्हिडीओत तुम्ही पाहू शकतात काही प्रवासी विमानात चालत आहे. त्याचवेळी एका महिलेचा ओरडण्याचाही आवाज येत आहे. व्हिडीओच्या मध्येच एका महिलेला सीटला बांधल्याचीह दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.