मुंबई, 02 डिसेंबर : तुम्ही मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करत असाल किंवा केला असाल तर गर्दीत चढताना काय अवस्था होते याची माहिती असेलच. रेल्वे खचाखच भरलेली असेल तर प्रवाशी एकमेकांना धक्के मारत चढतात किंवा उतरतात. असं करूनही चढायला मिळालं नाही तर साहजिकच ती ट्रेन सोडून त्यामागून येणारी ट्रेन आपण पकडतो. पण एका महिलेने मात्र हद्दच केली. गर्दीत चढायला मिळालं नाही म्हणून एका प्रवाशी महिलेने चक्क ट्रेन रोखली आहे. शेवटी लोकोपायलटने तिच्यासोबत जे केलं तेसुद्धा हैराण करणारं आहे.
गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनचा हा व्हिडीओ आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तसं ट्रेनमधील भांडणं तुमच्यासाठी नवी नाहीत. पण या व्हिडीओत जे घडलं ते थोडं वेगळंच आहे. ट्रेनमध्ये चढायला मिळालं नाही म्हणून महिला प्रवाशाने गोंधळ घातला. तिने ट्रेन रोखून धरली. ट्रेन जाऊ देणार नाही, अशा हट्टाला ही महिला पेटली. प्रवासी, पोलीस अगदी लोकोपायलटनेही तिला विनवणी केली पण ती कुणाचंच ऐकली नाही. अखेर लोकोपायटलने जे केलं ते पाहून तिथं उपस्थित प्रवाशीही शॉक झाले. हे वाचा - खिडकीची काच तोडून आत शिरला लोखंडी रॉड; प्रवाशाच्या मानेतून आरपार घुसला, जागीच मृत्यू व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रेल्वे स्टेशनवर एक ट्रेन उभी आहे. ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरली आहे. ट्रेनच्या दरवाजात काही महिला दिसत आहे. ही ट्रेन एसी ट्रेन आहे. ज्याचे दरवाजे ठराविक वेळेनंतर आपोआप बंद होतात. त्यानंतर ट्रेन सुरू होते. पण या दरवाजातच एक महिला उभी राहिली आहे. गर्दीत तिला चढायला मिळालं नाही म्हणून ती दरवाजावरच उभी राहिली. तिने मुद्दामहून ट्रेन रोखून धरली. दरवाजा बंद झाल्याशिवाय ट्रेन काही सुरू होणारी नव्हती. त्यामुळे सर्वजण तिला खाली उतरण्यासाठी विनवणी करत होते. प्रवाशांनी तिला समजावलं. पोलिसांनीही तिला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. शेवटी ट्रेनचा लोकोपायलटही तिथं आला आणि तोसुद्धा तिला विनवणी करू लागला. पण महिला कुणाचंच ऐकायला तयार नाही. अखेरच लोको पायलटने तिला डब्यातून कसंबसं खाली उतरवलं आणि तो तिला आपल्यासोबत ट्रेनच्या इंजिनमध्ये बसायला घेऊन गेला. तेव्हा कुठे ट्रेन सुरू झाली. हे वाचा - रेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! हा VIDEO आता पाहिला नाही तर नंतर होईल पश्चाताप @ragiing_bull ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.