अलीगड, 2 डिसेंबर : भारतीय रेल्वेशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोमना आणि डंबर रेल्वे स्थानकादरम्यान दिल्ली-कानपूर निलांचल एक्स्प्रेस ट्रेनमधील एका प्रवाशाच्या गळ्यामध्ये लोखंडी रॉड घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रेनमध्ये खळबळ उडाली होदती. यानंतर अलिगड रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
खिडकीची काच तोडून आत शिरला लोखंडी रॉड; निलांचल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या मानेतून आरपार घुसला, जागीच मृत्यू pic.twitter.com/9DOJXW2D9R
— News18Lokmat (@News18lokmat) December 2, 2022
हरिकेश दुबे (रा. संतराम रा. सुलतानपूर, गोपीनाथपूर सुलतानपूर) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. घटनेनंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रेल्वे स्तरावरून घटनास्थळी बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. लोखंडी रॉड रेल्वेच्या डब्याची काच फोडून सीटवर बसलेल्या तरुणाच्या गळ्यात घुसला. यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वेने हा अपघात कोणत्याही बांधकामामुळे झाल्याचा इन्कार केला. त्याचवेळी अधिकारी घटनास्थळ शोधण्यात व्यस्त आहेत. ट्रेनचा वेग जास्त असल्याने अद्याप घटनास्थळाचा शोध लागलेला नाही. सीपीआरओ एनसीआर हिमांशू शेखर उपाध्याय यांनी सांगितले की, आरपीएफ आणि जीआरपी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

)







