जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रूममध्ये दिसलं असं काही की भडकली महिला; हॉटेलकडून घेतली 76 लाखांची भरपाई

रूममध्ये दिसलं असं काही की भडकली महिला; हॉटेलकडून घेतली 76 लाखांची भरपाई

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आयव्ही अल्ड्रिज नावाच्या महिलेने हॉटेलच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांना कोर्टात खेचलं. सोबतच नुकसान भरून काढल्यावरच तिने त्यांची सुटका केली

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 मे : कुठेतरी फिरायला जाताना लोक अनेकदा हॉटेल किंवा लॉजमध्ये थांबतात. मात्र त्याआधी इंटरनेट किंवा साइट्सवर जाऊन त्याचे रिव्ह्यू तपासतात. त्याआधी तिथे गेलेल्या ग्राहकांचे अनुभव बघून मग ते त्याठिकाणी राहायचं की नाही हे ठरवतात. याचं कारण म्हणजे एवढे पैसे मोजल्यावर आपल्याला सुरक्षितता आणि योग्य सोयी मिळाव्या, असा उद्देश असतो. मात्र एक हॉटेल आपली ही जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलं. बापरे! ही अशी कसली Covid test; Video पाहून नेटिझन्स हादरले, व्यक्त केला संताप कॅलिफोर्नियातील डिस्नेलँड हॉटेलमध्ये थांबलेल्या आयव्ही अल्ड्रिज नावाच्या महिलेने हॉटेलच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांना कोर्टात खेचलं. सोबतच नुकसान भरून काढल्यावरच तिने त्यांची सुटका केली. महिलेने आरोप केला होता की हॉटेलच्या खोलीत ढेकुण होते (Bedbugs in Hotel Room), जे झोपेत असताना तिला भरपूर चावले. तिच्या अंगावर पुरळ उठले होते. प्रकरण वाढल्याने हॉटेलचीही बदनामी होणार असल्याने हॉटेल व्यवस्थापनाने महिलेला 76 लाख रुपये भरपाई देऊन प्रकरण मिटवलं.

News18

हे प्रकरण 2018 चं आहे, जे आता निकाली निघालं आहे. हॉटेलच्या खोलीत बेडबग्स असल्यामुळे होणारा त्रास सांगताना महिलेने तिचे काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये ढेकुण चावल्याच्या खुणा आणि परिणाम दिसत होते. एल्ड्रिजच्या म्हणण्यानुसार, रात्री गाढ झोपेत असताना बेडबग्स तिला चावू लागले, ज्यामुळे तिच्या संपूर्ण शरीरात प्रचंड वेदना होत होत्या. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला. इतकंच नाही तर बेडबग्सने तिच्या संपूर्ण कपड्यांमध्येच आपलं घर बनवलं, ज्यामुळे तिच्याकडे बदलण्यासाठी कपडे देखील नव्हते. हॉटेलने तिचा हा आरोप खोटा ठरवू नये म्हणून तिने या सगळ्याचे फोटोही काढून ठेवले. लई धुतला, गावठी स्टाईलची हाणामारी थेट विमानातच! Video पाहिल्यावर विश्वास नाही बसणार डिस्नेने लॉस एंजेलिस टाईम्सला सांगितलं की खटल्याचा खर्च टाळण्यासाठी सेटलमेंटचा मार्ग निवडला गेला. डिस्नेने असंही म्हटलं आहे की कंपनी आपल्या हॉटेलचं वातावरण सुरक्षित आणि ढेकुणमुक्त राहील याची खात्री करण्याचा प्रयत्न करेल. खरं तर, केस दाखल करणाऱ्या महिलेने दावा केला होता की कंपनी हे हॉटेल सुरक्षित आणि नीटनेटके ठेवण्यात अपयशी ठरली आहे. ज्याचा तिला फटका सहन करावा लागला. एल्ड्रिजने दावा केला की तिला उपचारासाठी खूप पैसा खर्च करावा लागला, तसंच नोकरीतून ब्रेक घ्यावा लागला. ज्याची भरपाई हॉटेलला करावी लागणार होती. त्यामुळे सुमारे 76 लाख रुपयांमध्ये तडजोड करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात