बीजिंग, 06 मे : बहुतेक देशांमध्ये कोरोना टेस्ट (Corona test) बंधनकारक करण्यात आली आहे. काही लोकांना कोरोना टेस्ट करण्याचीच भीती वाटते आहे. त्यामुळे ते कोरोना टेस्ट करण्यास टाळाटाळ करतात किंवा नकार देतात. पण जिथं कोविड टेस्ट (Covid test) बंधनकारक आहे, तिथं प्रशासन अशा नागरिकांची टेस्ट करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाताना दिसत आहे. असाच एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कोरोना टेस्ट करण्यासाठी नाक किंवा घशातील नमुने घेतले जातात. यासाठी कॉटन स्वॅब नाक किंवा घशात टाकला जातो. अशीच टेस्ट या व्हिडीओतही केली जात आहे. पण ती ज्या पद्धतीने केली जात आहे, ती पद्धत खतरनाक आहे. थेट जमिनीवर आडवं पाडून लोकांची जबरदस्ती कोरोना टेस्ट केली जाते आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हे वाचा - Yuck! तरुणीने थुंकीने अनलॉक केला फोन; किळसवाणा पण शॉकिंग VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक महिलेला जमिनीवर आडवं पाडण्यात आलं आहे. दोन व्यक्ती तिची जबरदस्ती कोरोना टेस्ट करत आहे. एक पुरुष तर तिच्या शरीरावरच बसला आहे. त्याने तिचे हातही दाबून धरले आहेत. तिचं नाक आणि तोंड उघडलं आहे आणि दुसरी पीपीई किट घातलेली व्यक्ती हातात स्वॅब घेऊन त्या महिलेच्या नाकात टाकते आणि तिचा सॅम्पल घेते. महिला त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करते आहे. पण तिला ते शक्य होत नाही आहे.
这个强行检测姿势应该让全世界看一看🤬😡 pic.twitter.com/PUwnfCXF4t
— 浩哥i✝️i🇺🇸iA2 (@S7i5FV0JOz6sV3A) April 27, 2022
हा व्हिडीओ चीनमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. चिनी सोशल मीडिया वीबोवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. जो इतर सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हे वाचा - लई धुतला, गावठी स्टाईलची हाणामारी थेट विमानातच! Video पाहिल्यावर विश्वास नाही बसणार ज्या चीनमध्ये कोरोनाचा सर्वात आधी उद्रेक झाला त्या चीनमध्ये कोरोना पुन्हा थैमान घालतो आहे (Covid Test) . त्यामुळे चिनी सरकारने कठोर पावलं उचलली आहे. झिरो कोविड अंतर्गत बरेच कडक नियम बनवण्यात आले आहेत. नागरिकांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. जे लोक कोरोना टेस्टला नकार देत आहेत, त्यांची जबरदस्ती कोरोना टेस्ट केली जाते.